‘वन स्टेट, वन एक्झम’ धोरण राज्यात राबवावं, देशात महाराष्ट्र आदर्श होईल….
स्पर्धा परीक्षांबाबात बोलताना ते सदाभाऊ खोत यांनी सांगितले की, तलाठी, ग्रामसेवक , प्राध्यापक ही पदंसुद्धा एमपीसीच्या माध्यमातून भरली गेली पाहिजे.
पुणेः स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली. यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत चर्चा करून हा विधानसभेत स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडू असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी आज व्यक्त केला. यावेळी त्यांनी वन स्टेट, वन एक्झम हा निर्णय सरकारला घ्यावा लागेल असंही त्यांनी आज स्पष्ट केले.
स्पर्धा परीक्षांबाबात बोलताना ते सदाभाऊ खोत यांनी सांगितले की, तलाठी, ग्रामसेवक , प्राध्यापक ही पदंसुद्धा एमपीसीच्या माध्यमातून भरली गेली पाहिजे.
यामुळे राज्यात गुणवत्ता तयार होईल असंही त्यांनी बोलताना सांगितले. एमपीएससीच्या छताखाली ग्रामसेवकापासून ते प्राध्यापकापर्यंतची पदं जर आली तर त्यामुळे राज्यात गुणत्ता निर्माण होईल. यासाठी व्यापक धोरण राबवणेही गरजेचे आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आजच्या काळात शिक्षक, प्राध्यापक ही पदं भरत असताना त्या त्या शैक्षणिक संस्थांना अधिकार दिले असल्यामुळे हा सगळा पैशाचा खेळ आहे असंही त्यांनी सांगितले.
यामुळे पैसे असणारी माणसं शिक्षक, प्राध्यापक होतात. आणि गुणवत्ता असलेली माणसं मात्र बाजूला फेकली जातात अशी आजची परिस्थिती निर्माण झाल्याने आज वन स्टेट वन एक्झम धोरण राबवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मागील सरकार अशा प्रश्नांकडे लक्ष देत नव्हते, मात्र आताचे सरकार हे संवेदनशील माणसांचे सरकार असल्याचे सांगत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा गौरवही केला. यावेळी त्यांनी आमदारा गोपीचंद पडळकर यांना सांगितले की, आता आपले सरकार आहे.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याबाबतची एक बैठक झाली तर स्पर्धा परीक्षा घेणाऱ्यांचा प्रश्न तात्काळ सुटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.