Saif Ali Khan Attack : सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अटक?
मध्यरात्री दोनच्या सुमारास अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला, या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील एका हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
मोठी बातमी समोर येत आहे, अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्यांपैकी एका हल्लेखोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या हल्लेखोराला बांद्रा पोलीस स्टेशनला हजर केलं जाण्याची शक्यता आहे. सैफ अली खानच्या घरात तीन हल्लेखोर शिरले होते. यापैकी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर अजून दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून या दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप या वृत्ताला कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये.
हल्ल्यामध्ये सैफ गंभीर जखमी
मध्यरात्री दोन ते अडीच वाजेदरम्यान सैफ अली खान याच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. समोर आलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हे त्याच्या घरातच दबा धरून बसले होते. यातील एका हल्लेखोराचा आणि सैफच्या घरात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा वाद झाला. त्यानंतर आवाज ऐकून सैफ आपल्या रूममधून बाहेर आला. त्याचवेळी त्याच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोरानं त्याच्यावर चाकून हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन हल्लेखोर सैफ अली खानच्या घरात घुसले होते, त्यातीलच एकाने हल्ला केला. या तीन पैकी एकाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर अद्याप दोन हल्लेखोर फरार आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे. मात्र हल्लेखोराच्या अटकेच्या वृत्ताला अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाहीये.
समोर आलेल्या माहितीनुसार हल्लेखोर लोकलने वाद्रा येथे पोहोचला, त्यानंतर त्याला सैफ अली खानच्या घरात प्रवेश करायचा होता, पण कडेकोट सुरक्षेमुळे ते शक्य नव्हतं. त्यामुळे त्याने आधी शेजारच्या इमारतीमध्ये प्रवेश केला, तिथून त्याने या इमारतीमध्ये प्रवेश केला. जीना चढण्यासाठी त्याने इमर्जन्सी पायऱ्यांचा वापर केला.