महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. काल मतदान पार पडलं आहे. शनिवारी मतमोजणी पार पडणार आहे. या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. 23 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील, असं संजय राऊत म्हणालेत. 23 तारखेला 10. 30 ते 11 वाजता मी सांगेल महाविकास आघाडीचा कोण मुख्यमंत्री असेल. नाना पटोले यांना मुख्यमंत्री बनवायचा असेल तर राहुल गांधी आणि खर्गे आणि सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलं पाहिजे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
एक्झिट पोल हा एक फ्रॉड आहे. हरियाणामध्ये काँग्रेस ६० च्या वर जागा येईल पण काय झाले आपण पाहिले. लोकसभेला ४०० पार पण काय झाले आपण पाहिलं. लोकांनी मतदान केले ते गुप्त असतं काही लोक गोंधळ वाढवण्याचा प्रयत्व करतात. मविआ. २६ तारखेला संध्याकाळ पर्यंत आम्ही सत्ता स्थापन करण्याचा दावा करू शकतो. मविआला १६०-१६५ जागा एकत्रित निवडून येत आहे. त्यामुळे एक्झिट पोल वरती कोणीही विश्वास ठेवू नये.आम्ही २३ तारखेला ही सत्तेवर दावा करू, असं संजय राऊत म्हणालेत.
सत्तेचा चाव्या येतात की फक्त कुलूप येणार 72 तासाने ठरेल. प्रचंड पैसे आणि यंत्रणा गैर वापर केला आहे. पैशापेक्षा महत्वाचा महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान आहे. जनतेने महाराष्ट्रासाठी मतदान केले. आमचं स्पष्ट होते की महारष्ट्र की अदानी हवा आहे. ट्रम्प प्रशासनाने अदानी विरुद्ध अटक वॉरंट काढले आहे. 250 मिलियम डॉलरचा भ्रष्टाचार आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
अमित शाह, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे संगमत करून भ्रष्टाचार करुन जागा आणि टेडर बळकविण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला आहे. आम्ही सुद्धा ट्रम्प प्रशासन प्रमाणे कारवाई करू म्हणून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा टाकला आहे, असं संजय राऊत म्हणालेत.