नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचे प्रयत्न, फडणवीसांनी रसद पुरवली; संजय राऊतांचे सनसनाटी आरोप

Samana Editorial on Nitin Gadkari Narendra Modi Devendra Fadnavis and Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणावर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचे प्रयत्न, फडणवीसांनी रसद पुरवली; संजय राऊतांचे सनसनाटी आरोप
Follow us
| Updated on: May 26, 2024 | 12:21 PM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठा आरोप केला आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणावर संजय राऊतांनी भाष्य केलंय. भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केले. गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद पुरवली असं संघाचे लोक सांगतात, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. सामनाच्या रविवार विशेष ‘रोखठोक’ या सदरातून संजय राऊतांनी मोठा आरोप केला आहे. याचसोबत लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही त्यांनी भाष्य केलं आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

जूननंतर भाजपात मोदी- -शहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी- शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या वासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस पराभवासाठी यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात. जे गडकरींचे तेच योगींचे…

अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपला ३० जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम ४ जूनला दिसेल.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची राजवट ४ जूननंतर संपत आहे. याबाबत आता कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. या दोघांना सत्तेवरून दूर करण्यासाठीच देशातील जनतेने मतदान केले. मोदी व शहा यांनी देशाचा तुरुंग केला व लोकशाहीलाच बंदिवान केले. त्यामुळे मोदी-शहांचा पराभव होऊ शकत नाही असा भ्रम निर्माण झाला. मोदी हे देवाचे अवतार आहेत असे चित्र निर्माण केले. त्यामुळे घरात अन्न, वीज, पाणी, रोजगार, निवारा नाही, पण मोदी हवेत. “माती खाऊन जगू” असे बोलणारे अंधभक्त या काळात दिसले, पण ज्यांनी आतापर्यंत मोदींना मतदान केले तो शेतकरी, कष्टकरीच मोदींच्या विरोधात उभा ठाकला. मोदी यांनी देशावर रशियाच्या पुतीनप्रमाणे राज्य केले.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.