sambhaji chhatrapati: स्वतंत्र मागासवर्ग आयोगाला खासदार संभाजी छत्रपतींचा विरोध; म्हणाले, उगाच दिशाभूल करू नका

मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

sambhaji chhatrapati: स्वतंत्र मागासवर्ग आयोगाला खासदार संभाजी छत्रपतींचा विरोध; म्हणाले, उगाच दिशाभूल करू नका
स्वतंत्र मागासवर्ग आयोगाला खासदार संभाजी छत्रपतींचा विरोध; म्हणाले, उगाच दिशाभूल करू नका
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 1:21 PM

मुंबई: मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग (Maharashtra State Backward Class Commission) स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्य शासन व मंत्रिमंडळ उपसमितीने मराठा समाजाबाबत आजवर घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीचा विस्तृत आढावा घेण्यात आला. तसेच प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कालबद्ध रितीने कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र, खासदार संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांनी सरकारच्या या नव्या मागासवर्ग आयोगाला विरोध केला आहे. एक मागासवर्ग आयोग असतानाच दुसरा आयोग कशाला? असा सवाल करत उगाच दिशाभूल करू नका, असं संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नव्या मागासवर्ग आयोगाच्या मुद्द्यावरून सरकार आणि मराठा समाज आमनेसामने उभे ठाकण्याची चिन्हे दिसत आहेत.

खासदार संभाजी छत्रपती यांनी आजपासून उपोषण सुरू केलं आहे. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी मीडियाने त्यांना नव्या मागासवर्ग आयोगबाबत विचारणा केली असता संभाजी छत्रपती यांनी या आयोगाला विरोध दर्शविला. एक मागासवर्गीय आयोग असताना, मराठा समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची कायद्यात घटनेत तरतूद नाही. उगाच समाजाची दिशाभूल करू नये, अशा शब्दात संभाजी छत्रपती यांनी सरकारला ठणकावले. यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या विधानावरही प्रतिक्रिया दिली. मी राजकारणात नवखा आहे. ते दिगग्ज आहेत. कसं वागायचं हा सल्ला आता त्यांनीच द्यावा, असा चिमटा त्यांनी काढला.

हा लढा मी लढायलाच हवा

मी महाराजांचा वंशज आहे. हा लढा मी लढायलाच हवा. हा माझा निर्णय आहे. अनेक आंदोलने केली. सरकारकडे मागण्या दिल्या. पण सरकारने शब्द पाळला नाही. शब्द न पाळल्याने मला दुसरा पर्याय राहिला नाही. मी जी चळवळ सुरू केली. त्यात समाज वेठीस धरला जाऊ नये म्हणून मी आमरण उपोषण सुरू केलं आहे. 17 जूनला ज्या मागण्या केल्या होत्या. त्याच मागण्या आहेत. त्यात तसूभरही बदल केला नाही. पण सरकारने मागण्या मान्य केल्या नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

म्हणे कोर्टाच्या निर्णयाचा भंग होईल

मराठा आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं होतं. पण अजून गुन्हे मागे घेतले नाही. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मुलांचा विषय होता. त्यांचं सिलेक्शन झालं त्यांना अजून नियुक्त्या नाही. कोर्टाचा संबंध नाही. ते म्हणतात कोर्टाच्या निर्णयाचा भंग होईल. मला माहीत नाही काय भंग होईल. कुंभकोणी महा कुंभ आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.

संबंधित बातम्या:

sambhaji chhatrapati: छत्रपतींना धमक्या?, धमकी आली तर मला काहीच करावं लागणार नाही; धमकी देणाऱ्यांना संभाजी छत्रपतींचा सूचक इशारा

VIDEO: सरकारने शब्द पाळला नाही, उपोषणाशिवाय पर्यायच नव्हता; खासदार संभाजी छत्रपतींचं उपोषण सुरू

पाणंद रस्त्यावरुन ग्रामपंचायत अन् ग्रामस्थांमध्ये जुंपली, आता पंचनाम्यामुळे नेमकी ‘पंचाईत’ कोणाची?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.