मुंबई: छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मनुष्यबळ विकास संस्था पुणे म्हणजेच सारथी संस्थेमार्फत युपीएससीसाठी फेलोशिप दिलेल्या 21 विद्यार्थ्यांची युपीएससीत वर्णी लागली आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या 21 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. दिल्लीत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथीमार्फत शिष्यवृत्ती दिली जात होती. हाच धागा पकडत खासदार संभाजी छत्रपती यांनी सारथी संस्थेचं महत्व अधोरेखित करणारं ट्विट केलं आहे. ‘सारथी’ मुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना UPSC सारख्या परिक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होण्यात मोलाचा हातभार लागत आहे, हे यातून अधोरेखित होते. मराठा समाजासाठी आरक्षणा इतकीच सारथी संस्था देखील महत्त्वाची आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले. याचसाठी सारथी संस्थेच्या विकासाकरिता मी लढा देत आहे, असं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले.
सारथीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे त्यांचं कौतुक करण्यात आलं आहे. सारथी यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा करणार सत्कार करणार आहे.
विनायक कारभारी नरवाडे, गौरव रविंद्र साळुंखे, प्रतिक अशोक धुमाळ, प्रथमेश अरविंद राजशिके, आनंद अशोक पाटील, सागर भारत मिसाळ, सुरज भाऊसाहेब गुंजाळ, अनिल रामदास मस्के, अर्पिता अशोक ठुबे, अमोल सुरेशराव मुरकुट, अनिकेत अशोक फडतरे, राकेश महादेव अकोलकर, ओंकार मधुकर पवार, नितीन गंगाधर पुके, प्रणव विनोद ठाकरे , रणजीत मोहन यादव, माधुरी भानुदास गरुड, पूजा अशोक कदम, हर्षल भगवान घोगरे, रविराज हरिश्चंद्र वडक, सायली अशोक गायकवाड
….म्हणून ‘#सारथी‘साठी माझा लढा !
‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले…!UPSC च्या जाहीर झालेल्या निकालात उत्तीर्ण झालेल्यांपैकी तब्बल २१ उमेदवार हे ‘सारथी’च्या योजनांचे लाभार्थी आहेत.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) September 25, 2021
खासदार संभाजी छत्रपती यांनी ट्विट करुन सारथीतर्फे फेलोशिप मिळवून प्रशिक्षण घेत यूपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. “….म्हणून ‘#सारथी’साठी माझा लढा !
‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले…!”, असं ट्विट खासदार संभाजी छत्रपती यांनी केलं आहे. UPSC च्या जाहीर झालेल्या निकालात उत्तीर्ण झालेल्यांपैकी तब्बल २१ उमेदवार हे ‘सारथी’च्या योजनांचे लाभार्थी आहेत, असं संभाजी छत्रपती म्हणाले आहेत. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षणा इतकीचं सारथी संस्था महत्त्वाची आहे, असं संभाजी छत्रपती म्हणाले. सारथी’ मुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना UPSC सारख्या परिक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होण्यात मोलाचा हातभार लागत आहे, हे यातून अधोरेखित होते. मराठा समाजासाठी आरक्षणा इतकीच सारथी संस्था देखील महत्त्वाची आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले. याचसाठी सारथी संस्थेच्या विकासाकरिता मी लढा देत आहे, असं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले.
इतर बातम्या:
शाळेत असताना चहा, भजी विकली, आता क्लास वन ऑफिसर, बारामतीच्या अल्ताफ शेखचे घवघवीत यश !
Sambhaji Chhatrapati said for the progress of Maratha Samaj SARTHI is just as important as Reservation after UPSC Result