शिवसेनेसोबतच्या ‘त्या’ चर्चेत नेमकं काय झालं? दिलेला शब्द पाळला नाही?,संभाजी राजेंनी ‘ती’ गुप्त चर्चा सार्वजनिक केली, पाहा काय म्हणाले…
संभाजी राजे यांनी आपली बाजू मांडताना मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेचा उल्लेख केला. ते म्हणाले, "शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊयात... आपण दोघांनी शिवाजी महाराजांना स्मरण करायचं आणि जर संभाजी छत्रपती खोटं बोलत असेल तर, तुम्ही तसं मला सांगा."
मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांची उमेदवारी हा सध्या चर्चेचा विषय आहे. मध्यंतरी संभाजी राजे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. त्यासाठी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यंची भेट घेतली. त्या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? शिवसेनेने संभाजीराजेंना उमेदवारी न देत संजय पवारांना उमेदवारी कशी दिली, संभाजी राजे राज्यसभा निवडणूक लढणार आहेत का? की दुसरा कोणता पर्याय ते निवडणार? असे असंख्य प्रश्न महाराष्ट्राला पडले होते. याचं उत्तरं संभाजी राजे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
मी खोटं बोलत असेल तर…
संभाजी राजे यांनी आपली बाजू मांडताना मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेचा उल्लेख केला. ते म्हणाले, “शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊयात… आपण दोघांनी शिवाजी महाराजांना स्मरण करायचं आणि जर संभाजी छत्रपती खोटं बोलत असेल तर, तुम्ही तसं मला सांगा.”
संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवरही भाष्य केलं. “मुख्यमंत्र्यांनी दोन खासदारांना माझ्याकडे पाठवलं. आमची चर्चा झाली. त्यांनी मला सांगितलं की आमची इच्छा आहे की, तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा, आम्ही उद्याच तुमची उमेदवारी जाहीर करतो. पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, मी ही निवडूक अपक्ष म्हणून लढवणार आहे”, असं या खासदारांना सांगतल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं.
“मी अपक्ष लढण्यावर ठाम होतो. मुख्यमंत्र्यांना शिवसेने प्रवेश करावा असं वाटत होतं. एका मंत्र्याचा फोन आला, त्यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चा करायला सांगितलं होतं. पुन्हा एकदा शिवसेना प्रवेशाचा मुद्दा समोर आला पण मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो. मी त्यांना सांगितलं की असं जर असेल तर ही मिटींग संपली. मी शिवसेनेत येऊ शकत नाही,” असं संभाजी राजेंनी सांगितलं.
ध्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. यात संभाजीराजेंच्या उमेदवारीचा मुद्दा चर्चेत आहे. आज त्यांनी या सगळ्याला ब्रेक लावत निवडणुकीतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं. पण आपली माघार आपला स्वाभिमान असल्यांचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय आपण जनतेसाठी कायम काम करत राहू असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.