Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्याची व्यक्त केली अपेक्षा

ज्या कोणाचे राज्यात सरकार येईल, त्यांनी सामान्य माणसाचे, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्यांचे, विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्रश्न सोडवावे. मराठा समाजाचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवावेत, असे काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती म्हणाले होते.

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्याची व्यक्त केली अपेक्षा
संभाजीराजे छत्रपतींनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेटImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 5:55 PM

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर आज संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. मुंबईतील सागर या त्यांच्या निवासस्थानी संभाजीराजे यांनी फडणवीस यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी त्यांनी ट्विट करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अभिनंदन केले होते. राज्याला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्यासह मराठा समाजाचे सर्व प्रलंबित प्रश्न आपण मार्गी लावाल, ही अपेक्षा असे ट्विट त्यांनी केले होते. तर मराठा आरक्षणप्रश्नी उपोषणावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांची भेट घेतली होती. तो फोटो त्यांनी ट्विट केला आहे. नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली.

‘मराठा समाजाचे प्रश्न सोडवावेत’

मागील काही दिवसांपासून राज्यात अस्थिर वातावरण होते. शिवसेनेतून एकनाथ शिंदेंसह इतर आमदार बाहेर पडले. त्यामुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारही कोसळले. यावेळी त्यांना विचारले असता, ते म्हणाले होते, की ज्या कोणाचे राज्यात सरकार येईल, त्यांनी सामान्य माणसाचे, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्यांचे, विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्रश्न सोडवावे. मराठा समाजाचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवावेत. आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. आता यासंबंधी काम करण्याची जबाबदारी आताच्या सरकारवर आहे, अशी चर्चा झाल्याची शक्यता यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेवर नाराजी?

राज्यसभेच्या उमेदवारीवरून संभाजीराजे छत्रपती शिवसेनेवर नाराज असल्याचे मागील काही दिवसांतून दिसून आले. शिवसेनेत बंड झाल्यानंतरची त्यांची प्रतिक्रियाही काहीशी अशीच होती. हा शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न आहे. कुठे जायचे हा त्या बंडखोर आमदारांचा अधिकार आहे. मात्र मला शिवसेनेतर्फे राज्यसभेचा उमेदवार म्हणून पुरस्कृत केले असते, तर असा खेळखंडोबा झालाच नसता, असे ते म्हणाले होते.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.