MPSC परीक्षा रद्द होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; संभाजीराजेंचा इशारा

राज्य सरकार जोपर्यंत MPSC परीक्षा रद्द करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे.

MPSC परीक्षा रद्द होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; संभाजीराजेंचा इशारा
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 11:11 PM

मुंबई : राज्य सरकार जोपर्यंत MPSC परीक्षा रद्द करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे. सरकारनं आमची बाजू ऐकून घेतली, सरकार देखील सकारात्मक असल्याची माहिती संभाजीराजेंनी दिली. (Sambhajiraje said protest will continue till govt cancelled MPSC exams)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आम्ही समाजाची भावना सांगितल्या असून समाज कसा व्यथित आहे हे सविस्तरपणे सांगितले. २०१९ मध्ये ज्या एमपीएससी परीक्षा झाल्या त्यात ४२० पैकी मराठा आणि इतर समजाच्या नियुक्त्या झाल्या नाहीत, हा मुद्दा सरकारसमोर मांडला, त्यांना देखील हा मुद्दा पटला आहे.एमपीएससीच्या पूर्वीच्या जागा भरल्या नाहीत, मग पुन्हा भरती का काढली हा आमचा प्रश्न आहे. अकरावी आणि अभियांत्रिकी कॉलेज सोडले तर काही अडचण नाही. सरकारने जागा वाढवाव्यात, अशी आम्ही मागणी आहे.

102 व्या घटनादुरुस्तीला मी पाठिंबा दिला होता. १९६७ पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत होते. राज्य मागासवर्गीय आयोगाला 288 आमदारांनी मंजुरी दिली. ज्या आमदारांनी हे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला ते आमदार चुकीचे आहेत का?, असा सवाल संभांजीराजेंनी केला.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत. शाहू महाराज आणि बाबासाहेबांचे संबंध होते. प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजेंवर वक्तव्य करणे, मला पसंत पडले नाही, त्यांनी तसे वक्तव्य करायला नको होते. माझ्याबद्दल ते काही बोलले असतील तर ती लोकशाही आहे.

EWS चा शासन निर्णय निघणार होता. SEBC चा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. त्या आरक्षणासाठीच लढण्याचा निर्णय झाला. EWS बाबत सरकार आणि वकिलांना लिहून देण्याची मागणी केली. त्यावर आम्ही ही जबाबदारी घेऊ शकत नाही, असे थोरात या वकिलांनी सांगितल्याची माहिती संभाजीराजेंनी पत्रकारांना दिली.

संबंधित बातम्या :

संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह टीका अंगलट, गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा

Narendra Patil | उदयनराजे-संभाजीराजेंबाबत चुकीचे उद्गार, आंबेडकरांना जाब विचारणार : नरेंद्र पाटील

(Sambhajiraje said protest will continue till govt cancelled MPSC exams)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.