“वानखेडेंबाबत तक्रार आल्यास आम्ही चौकशी करू,” राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची कागदपत्रे मी तपासली आहेत. ते अनुसूचित जाती प्रवर्गाचे असल्याचं असं मला सकृतदर्शनी वटतं. वानखेडे यांनी धर्मपरिवर्तन केल्याची बाब स्वीकारलेली नाही, असं वक्तव्य राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी केलंय.
मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची कागदपत्रे मी तपासली आहेत. ते अनुसूचित जाती प्रवर्गाचे असल्याचं असं मला सकृतदर्शनी वाटतं. वानखेडे यांनी धर्मपरिवर्तन केल्याची बाब स्वीकारलेली नाही, असं वक्तव्य राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी केलंय. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर वानखेडे यांनी आज भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा केली. वानखेडे यांनी जातप्रमाणपत्रासह अनेक कागदपत्रे आणि एक निवेदनही हलदर यांना दिलं. त्यानंतर हलदर यांनी वरील वक्तव्य केलं.
वानखेडेंकडून पुरावे सादर
काही लोक कुटुंबावर जातीवरून अटॅक करत आहेत. त्यामुळे वानखेडे यांनी आमच्याकडे तक्रार केली आहे. तुम्ही शेड्यूल कास्टचे आहात का? असं मी वानखेडेंना विचारलं. त्यांनी हो म्हणून सांगितलं. तसेच काही पुरावेही सादर केले, असं त्यांनी सांगितलं.
वानखेडेंचे रेकॉर्ड तपासले
मी ड्रग्सच्या विरोधात काम करत आहे त्याचमुळे काही लोक मला जातीच्या आधारावर शिवीगाळ करत आहेत. काही लोक माझ्यावर जाणूनबुजून आरोप करत आहेत, असं त्यांनी मला सांगितलं. त्यांच्याशी बोलताना ते शेड्यूल कास्टच्या महार जातीचे असल्याचं मला जाणवलं. त्यांनी फॅमिली मॅटर मला सांगितलं. त्यांचा विवाह स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार झाला होता. त्यांचे रेकॉर्डही मी तपासले, असं त्यांनी स्पष्ट केलं.
एकतर्फी निर्णय देणार नाही
वानखेडे हे शिक्षित आहेत. ते कायदा जाणतात. त्यांच्याकडे कागदपत्रे आहेत, असं सांगतानाच आमच्याकडे त्यांच्या जातीबाबत कोणी तक्रार केल्यास आम्ही त्याची चौकशी करू. पण कोणताही निर्णय एकतर्फी होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणात महाराष्ट्र सरकार काय करतं ते पाहू. त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आपलं काम करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हलदर यांना अर्ज दिला
दरम्यान, हलदर यांच्या भेटीनंतर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी मागासवर्गीय आयोगाच्या उपाध्यक्षांना भेटायला आलो होतो. त्यांना माझा अर्ज दिला आहे. त्यांच्याशी चर्चाही केली. तसेच आयोगाच्या अध्यक्षांनाही आधीच निवेदन पाठवलेलं आहे, असं वानखेडे यांनी सांगितलं.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 30 October 2021 https://t.co/oLdaPu0dkH #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 30, 2021
संबंधित बातम्या:
शेतकऱ्यांना अल्प मदत, ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते 1 नोव्हेंबर रोजी काळ्या फिती लावणार
तो मी नव्हेच! आणखी एका किरण गोसावीचा खुलासा; नवाब मलिक यांचा ‘तो’ दावा खोटा ठरणार?
(sameer wankhede presented caste proof to sc commission)