मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ते मला न्याय देतील…

| Updated on: May 19, 2023 | 6:07 PM

मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडे यांना दिलासा दिला. त्यानंतर प्रतिक्रिया देताना समीर वानखेडे म्हणाले, मला फक्त एवढं म्हणायचं आहे की, मला केंद्र शासन, न्यायपालिका आणि एनसीबीवर पूर्ण विश्वास आहे

मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ते मला न्याय देतील...
sameer wankhede
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी, मुंबई : समीर वानखेडे यांना २४ मेपर्यंत कोर्टानं अटकेपासून संरक्षण दिलंय. समीर वानखेडे यांना हायकोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. समीर वानखेडे यांनी रीट पिटीशन दाखल केली होती. २२ मेपर्यंत त्यांना कोर्टानं अटकेपासून संरक्षण दिलंय. वानखेडे यांना २२ मेपर्यंत अटक नको, असं हायकोर्टानं म्हटलं आहे. समीर वानखेडे यांनी सीबीआय अटकेच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. कोर्टानं वानखेडे यांना तात्पुरते संरक्षण दिले आहे. सीबीआयच्या चौकशीला समीर वानखेडे हे सामोरे जातील. सोमवारी पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी होईल. या सगळ्या प्रकरणात काय अपडेट येतात, ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास

मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडे यांना दिलासा दिला. त्यानंतर प्रतिक्रिया देताना समीर वानखेडे म्हणाले, मला फक्त एवढं म्हणायचं आहे की, मला केंद्र शासन, न्यायपालिका आणि एनसीबीवर पूर्ण विश्वास आहे. मला ते न्याय देतील. मागच्या वर्षांपासून जो त्रास सुरु होता, आता त्याचं निवारण होणार आहे.

हे सुद्धा वाचा

आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांनी रीच पिटीशन दाखल केली होती. समीर वानखेडे यांनी तपासात सहकार्य करावे, असे म्हटले. समीर वानखेडे यांनी तपासात सहकार्य केले नाही, असा आरोपी सीबीआयने केला होता.

२५ कोटी रुपये खंडणीचे आरोप

समीर वानखेडे यांच्यावर 25 कोटी रुपयांच्या खंडणीचे आरोप केले जात आहेत, असा मोठा दावा वकील रिझवान मर्चंट यांनी केला आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई कोर्टात रिट याचिका दाखल केलेली. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली आणि कोर्टाने 22 मेपर्यंत वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण दिलं.

शाहरुख खान एक बाप म्हणून विनंती करत होता. त्यामध्ये पैशांसंबंधी काहीच संभाषण झालेलं दिसत नाहीय. तसं असतं तर ते संभाषणात दिसलं असतं. ज्ञानेश्वर सिंह आणि समीर वानखेडे दोघांबरोबर शाहरुख खानचे चॅट आहेत. मागे याचिकेत त्यांनी अधिकाऱ्यांनी पैसे मागितले नाही, असे नमूद केले होते. चॅटमध्ये शाहरुख खान वानखेडे यांना प्रामाणिक अधिकारी म्हणत आहेत.