VIDEO: टेररिस्ट कनेक्शन असतं तर लोकांनी निवडून दिलं असतं का?; बापासाठी लेक मैदानात; सना मलिक यांची निदर्शने

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. आज तिसऱ्या दिवशीही राष्ट्रवादीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं.

VIDEO: टेररिस्ट कनेक्शन असतं तर लोकांनी निवडून दिलं असतं का?; बापासाठी लेक मैदानात; सना मलिक यांची निदर्शने
मुसलमान म्हणजे दहशतवाद्यांशी संबंध आहेच असं होत नाही, बापासाठी लेक मैदानात
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 5:05 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांना अटक केल्यानंतर त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) रस्त्यावर उतरली आहे. आज तिसऱ्या दिवशीही राष्ट्रवादीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं. चेंबूरमध्येही आज जोरदार आंदोलन करण्यात आले असून स्वत: नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक (sana malik) या आंदोलनात उतरल्या आहेत. नवाब मलिक यांच्यावरील कारवाई चुकीची आहे. सूडाबुद्धीतून ही कारवाई करण्यात आल्याचा दावा करतानाच दहशतवाद्यांशी आमचं कनेक्शन असतं तर एवढ्या वर्षापासून जनतेने मलिक साहेबांना वारंवार निवडून दिलं असतं का? जनता काय पागल आहे का? असा सवाल सना मलिक यांनी केला. मलिक हे गेल्या 30 वर्षापासून राजकारणात आणि 40 वर्षांपासून समाज कारणात आहेत. ते सेल्फमेड मॅन आहेत, असं त्या म्हणाल्या. यातून कुठे तरी मतांसाठी फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत आहे. भाजपचं हे राजकारण योग्य नाही, असंही सना मलिक यांनी म्हटलं आहे. चेंबूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी सना मलिक बोलत होत्या.

नवाब मलिक यांना अटक केलीये म्हणजे याचा अर्थ कुठेतरी केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर केला जात आहे. आणि कुणाचाही संबंध कुणाशीही अशा पद्धतीने जोडू नये. या देशात लोकशाही आहे. माझे वडील तपास संस्थांच्या विरोधात बोलत होते म्हणून त्यांच्यावर कारवाई केली अशी माझी भावना आहे, असं सना मलिक यांनी सांगितलं.

राजीनामा घेण्याची गरज नाही

नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. त्याबाबत विचारले असता, त्यांनी राजीनामा द्यावा असं मला तरी वाटत नाही. त्यांनी राजीनामा देण्याची गरज आहे असं वाटत नाही. मलिक यांचा राजीनामा घेऊ नये असा निर्णय महाविकास आघाडी म्हणून सर्व नेत्यांनी घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं.

सूडाच्या भावनेतून कारवाई-जयंत पाटील

तर, नवाब मलिक यांनी सार्वजनिक जीवनात 30 वर्षे घालवली आहेत. त्यांच्यावर झालेली कारवाई केवळ ते केंद्र सरकारविरोधात बोलत असल्यामुळे होत आहे. यासाठी नवाब मलिक यांचा आतंकवादाशी संबंध लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. ईडी, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणा ज्याप्रकारे काम करत आहेत, या सर्व कारवाया सुडाच्या भावनेतूनच होत असल्याचे महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलं आहे. महाविकास आघाडी सरकारने या भूमिकेचा निषेध व्यक्त केला आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

मलिक रुग्णालयात दाखल

दरम्यान, नवाब मलिक यांची आज जेजे रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना अॅडमिट करण्यात आलं आहे. ईडीने आज सकाळी त्यांना जेजेमध्ये आणलं होतं. त्यावेळी मलिक यांच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नव्हता. मात्र, त्यांना कोणत्या कारण्यासाठी अॅडमिट करून घेतलं ते समजू शकलं नाही.

संबंधित बातम्या:

2024 पर्यंत आम्हाला सहन करायचंय, स्थायी समिती अध्यक्षांच्या घरावरील आयकराच्या धाडीनंतर राऊतांचा सूचक इशारा

नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा’ मुख्यमंत्री दाखवणार का? भाजप प्रवक्त्यांचा खोचक सवाल

‘बांगलादेशातून मुली आणून वेश्याव्यवसाय केला, आमच्याकडे Video आहे’ आणखी एक सनसनाटी आरोप

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.