उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, हे महाशय त्यांच्या…

Sanajay Raut on CM Eknath Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसंच राज ठाकरे यांच्यावरही संजय राऊतांनी टीकास्त्र डागलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, हे महाशय त्यांच्या...
राज ठाकरे, संजय राऊत
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 11:22 AM

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत झाली. या मुलाखतीत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. याला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी  महाराष्ट्राची आणि मुंबईची स्वतःच्या स्वार्थासाठी सुरू आहे आणि हे महाशय त्याच्या बाजूने उभे आहेत. महान नेते आम्हाला बोलायचे नाही पण तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या बाबत बोलताना जरा भान ठेवा…. महाराष्ट्रवरती डल्ला मारणाऱ्या हल्ला करणाऱ्या गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांबरोबर त्यांची लढाई सुरू आहे, असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरेंवर निशाणा

राज ठाकरे काय म्हणतात त्याला महाराष्ट्रात किंमत नाही. त्यांच्या पक्षाला फार स्थान आहे असे मला वाटत नाही. महाराष्ट्राच्या आणि त्यांच्या स्वाभिमाना विषयी त्यांच्या मनात काय आहे हे आमच्या मनात शंका कायम आहे. ठाकरे स्वाभिमानाच्या आणि अस्मितेचा प्रचार करत आहे. उद्धव ठाकरे यांची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे. शरद पवार यांची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे. हे दोन्ही नेते महाराष्ट्राच्या संघर्षासाठी उतरलेले आहे ते स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदेंनी कोणतीही चळवळ केली नाही त्यांनी पक्षात राहून फक्त वळवळ केली. एखादी चळवळ केली असेल तर त्यांनी समोर आणावं. ते वारंवार सांगत आहे मी बेळगावच्या आंदोलनामध्ये होतो. कोणत्या तुरुंगात होते तो कागद समोर आणावं. 43 जण बेळगावच्या तुरुंगात होते. एकनाथ शिंदे यांचे नाव आम्ही कधीच पाहिलं नाही. यावरती बेळगावमध्ये तीन केस आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदेंकडे मंत्रालयामध्ये सीमा भागाचे डिपार्टमेंट दिले होते. मला तीनदा अटक केली. मी त्यांना दहा वेळा फोन केला. आपण मंत्री आहात. तुम्ही या ठिकाणी या कधीही बेळगावमध्ये येण्याचा धाडस त्यांनी दाखवलं नाही हे काय चळवळीच्या गोष्टी सांगतात स्वतःची कातडी वाचवण्यासाठी राजकारण केले आहे. फक्त पैशासाठी बाकी काही केलेले नाही. यांनी कोणतेही आंदोलन केले नाही तुरुंगात गेले नाही एकही लाठी खाल्ली नाही.. हे काय सांगतात आम्हाला शिवसेना संदर्भात… पोलीस आणि ईडीला घाबरून भाजपमध्ये गेले उगाचच फुशारक्या मारू नये, अशा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.