मुंबई : राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मशीदीवरील भोंग्याबाबत घेतली भूमिका (Hanuman Chalisa) आणि त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांना आक्रमक होताना गेली काही संपूर्ण देश पाहत आहे. फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून यावर प्रतिक्रिया उमटत आहे. भाजपसहीत काही हिंदू संघटनांनी या भूमिकेचे समर्थन केले आहे. तर काहींनी या भूमिकेला कडाकडून विरोध केला आहे. राज ठाकरेंची औरंगाबादेतली सभा आणि ईद झाल्यावर मनसेकडून आणकी आक्रमकतेने हा नारा देण्यात आला. मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येत मनसे नेत्यांची धरपकड सुरू केली होती. याच दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कारण मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी या धरपकडीदरम्यान पोलिसांना गुंगारा दाऊन पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक महिला कर्मचारी जमिनीवर कोसळल्याचेही दिसून आले. त्यानंतर पोलिसांना गुगारा दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता संदीप देशपांडे (Sandip Deshpande) आणि संतोष धुरी यांनी यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली आहे.
या व्हिडिओ नंतर बराज राजकीय गदारोळ माजला होता. महाविकास आघाडी आणि खासकरून शिवसेनेच्या नेत्यांनी यावरून मनसेवर टीकेची झोड उडवली होती. त्यामुळे पोलिसांनी यात पुन्हा त्यांच्या गुन्हा दाखल केला आणि त्यांची शोधाशोध पोलिसांकडून सुरु होती. अशातच आता हे कोर्टात जामिनासाठी धाव घेत असल्याने कोर्टात त्यांना दिलासा मिळणार आणि संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांचा जामीन मंजूर होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या प्रकरणावर उद्या कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणार विरोधही काय आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून दोन्ही बाजुने प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपने राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन दिले असतानाच दुसरीकडे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपच्या एका नेत्याकडून विरोध होतोय. उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. मला पाठिंब्यासाठी महाराष्ट्रातून मुस्लिम आणि मराठी माणसांचे फोन येत आहेत. आज दुपारी मनसे कार्यलयातूनही मला फोन आला होता, मात्र मी घेतला नाहीये, असा दावाही त्यांनी केला आहे. तर आता राज ठाकरेंनी माफी जरी मागितली तरी 5 तारखेला राज ठाकरेंना अयोध्यात येऊ देणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. कारण ती वेळ आता निघून गेलीय, आता राज ठाकरेंना दौऱ्याची तारीख बदलावी लागेल, मला कुणाशी काही घेणं देणं नाही, माझ्या निर्णयावर मी ठाम आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.