हल्लेखोरांचे ‘कोच’ कोण? पोलीस शोधतील, कोविड घोटाळा काढल्यानेच हल्ला; संदीप देशपांडे यांचा आरोप

कोरोनाच्या भ्रष्टाचारामागे कोणती विरप्पन गँग आहे हे सर्वांना माहीत आहे. मी दोन दिवसात एक घोटाळा काढणार होतो. त्याचा सुगावा त्यांना लागला असेल. महावीर फर्निचर आणि ग्रेस फर्निचर या दोन फर्मचा हा घोटाळा होता.

हल्लेखोरांचे 'कोच' कोण? पोलीस शोधतील, कोविड घोटाळा काढल्यानेच हल्ला; संदीप देशपांडे यांचा आरोप
sandeep deshpandeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 12:32 PM

मुंबई : माझ्यावर कुणी हल्ला केला हे मला माहीत आहे. त्याबाबतची माहिती मी पोलिसांना दिली आहे. माझं म्हणणं मी एफआयआरमध्ये दिली आहे. त्यामुळे पोलीस तपास करत आहेत. ही चौकशी संपेपर्यंत मी कुणाचंही नाव घेणार नाही, असं सांगतानाच ते केवळ शिवाजी पार्कात क्रिकेट खेळायला आलेले नव्हते. त्यांचे कोच कोण आहेत हे सुद्धा पोलीस शोधून काढतील, असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. मी कोविड घोटाळा काढला. त्याची तक्रार केली आणि 48 तासात माझ्यावर हल्ला झाला, असा आरोपही संदीप देशपांडे यांनी केला. मात्र, आजही त्यांनी कुणावरही थेट आरोप केला नाही. कोणत्याही राजकीय नेत्याचं नाव घेतलं नाही.

संदीप देशपांडे यांच्यावर काल प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. तसेच त्यांच्या पायालाही जबर मार लागला आहे. या हल्ल्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याची माहिती दिली. याप्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. आज दोन लोकांना अटक केल्याचं कळलं. पोलिसांना सविस्तर चौकशी करू द्या. आम्हाला माहीत आहे, कोणी हल्ला केला ते. पण जोपर्यंत चौकशी होत नाही. त्यावर बोलणं योग्य नाही. शिवाजी पार्कला क्रिकेट खेळायला आले. ते क्रिकेटिएरच नव्हे तर त्यांचे कोचही कळतील. पोलिसांना स्टेटमेंट दिलं आहे. जेव्हा आरोपी पकडलं जाईल. तेव्हा माहिती समोर येईल, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

तपास होऊ द्या, मग बोलतो

माझं म्हणणं एफआयआरमध्ये मांडलं आहे. मला जे वाटतं ते पोलिसांना सांगितलं आहे. मला मारणाऱ्यांकडून जे ऐकू आलं ते पोलिसांना सांगितलं. पोलीस तपास सुरू आहे. यावर मी निश्चित बोलेन. आरोपींची अटक होऊन त्यांची चौकशी होऊ दे. मी त्यावर बोलणारच आहे. कोविडच्या संदर्भात आम्ही एक तक्रार केली होती. या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने बाळा कदम यांना अटक केली. त्यानंतर 48 तासात ही घटना घडली. त्यामुळे पोलीस योग्य तपास करतील, असं त्यांनी सांगितलं.

टर्नओव्हर वाढला कसा?

कोरोनाच्या भ्रष्टाचारामागे कोणती विरप्पन गँग आहे हे सर्वांना माहीत आहे. मी दोन दिवसात एक घोटाळा काढणार होतो. त्याचा सुगावा त्यांना लागला असेल. महावीर फर्निचर आणि ग्रेस फर्निचर या दोन फर्मचा हा घोटाळा होता. या दोन फर्मचा टर्न ओव्हर कोविड आधीपर्यंत 10 लाख होता. कोविड नंतर कोरोडोत गेला. त्यांना कोविड सेंटरमध्ये बेडशीट, गाद्या आणि कॉट पुरवण्याचे कंत्राट दिले. पण त्यांनी कधीच पुरवल्या नाही. त्यांची बिले मात्र गेली. स्वत:कडे कोणतेही पर्चेस नसताना त्या गोष्टी पुरवल्या गेल्या. मी आयुक्त इक्बालसिंह चहल यांना भेटलो. चौकशीची मागणी केली, अशी माहिती त्यांनी दिली.

थोबाडावर मारायचं होतं

केईएम हॉस्पिटलमध्ये पुअर बॉक्सचा घोटाळा झाला. त्याचीही चौकशीचे आदेश दिले. फर्निचर घोटाळा झाला. देढिया हे त्या माणसाचं नाव आहे. त्याचे फोटो शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासोबत आहेत. कोण आहे हा असा त्याला सर्व कामे मिळतात. मी जे घोटाळे उघड करतोय ते बंद करायचं होतं तर त्यांनी थोबाडावर मारायचं होतं. पण आमचं थोबाड बंद होणार नाही. ही भ्रष्टाचाराची प्रकरणं आमच्याकडे आहेत. ती प्रकरणं आम्ही काढत जाणार, असा इशाराही त्यांनी दिला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.