Pooja Chavhan case | “संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही, ‘ते’ वृत्त चुकीचे” : संजय राऊत
वनमंत्री संजय राठोडांनी ( (Sanjay Rathod) राजीनामा दिल्याची माहिती माझ्याकडे नाही. त्याबाबत मुख्यमंत्री माहिती देतील, असे संजय राऊत म्हणाले. (Sanjay Rathore resignation Sanjay Raut)
मुंबई : “वनमंत्री संजय राठोडांनी ( (Sanjay Rathod) राजीनामा दिल्याची माहिती माझ्याकडे नाही. त्याबाबत मुख्यमंत्री माहिती देतील. त्याबाबत मी भाष्य करणं योग्य नाही. ती माहिती चुकीची आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Rau) म्हणाले. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर मागील काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. पूजाच्या आत्महत्या प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा वनमंत्री संजय राठोड यांचाच असल्याचा उघड दावा भाजपने केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारवर दबाव वाढल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर अचानाकपणे राठोड यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवल्याचे म्हटले जाऊ लागले. मात्र, हे वृत्त शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फेटाळले असून ही माहिती चुकीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याबाबत बोलताना, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. येथे कायद्याचे राज्य आहे. प्रत्येक गोष्ट कायद्याच्या चौकटीत होतील. या प्रकरणात उच्च स्तरीय चौकशी सुरु आहे तपास हा एकाच चौकटीत फिरत नसतो. वेगवेगळ्या दिशेने तपास केला जातो. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचेसुद्धा लक्ष आहे. राठोड यांच्या राजीनाम्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. मुख्यंमंत्र्यांकडे राजीनामा दिला असेल, तर याविषयी ते जाहीर करतील. मी त्याविषयी बोलणे बरोबर नाही. राजीनाम्याची माहिती चुकीची आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
संजय राठोड यांचा राजीनामा?
पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राठोड यांच्या राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे पुण्यात दाखल झाले असून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहिती घेणार असल्याचं कळतंय.
संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा पाहा व्हिडीओ
संबंधित बातम्या :
राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही, आता तातडीने गुन्हा दाखल व्हावा: निलेश राणे
पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री संवेदनशील; केवळ आरोपावरून कारवाई करणं चुकीचं: दीपक केसरकर
Pooja Chavhan case : पुणे पोलिसांचे पथक यवतमाळमध्ये दाखल, रुग्णालयातील उपचाराबाबत तपास होणार