‘आका’ला सोडून इतरांना मोका, भाजपाची हीच राज्य करण्याची तऱ्हा, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा

Sanjay Raut attack on CM Devendra Fadnavis : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 33 दिवस उलटून गेले आहे. या गुन्ह्यातील सात आरोपींना मोका लावण्यात आला आहे. पण तपासावर अजूनही विरोधकच नाही तर सत्ताधारी गोटातील आमदार सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

'आका'ला सोडून इतरांना मोका, भाजपाची हीच राज्य करण्याची तऱ्हा, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा
संजय राऊतांचा घणाघात
Follow us
| Updated on: Jan 12, 2025 | 11:02 AM

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. त्याला 33 दिवस उलटून गेले आहे. या गुन्ह्यातील सात आरोपींना मोका लावण्यात आला आहे. पण तपासावर अजूनही विरोधकच नाही तर सत्ताधारी गोटातील आमदार सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा तपासावर बोट ठेवत, सरकारच्या भूमिकेवर कोरडे ओढले आहेत. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपाच्या धोरणावर आसूड ओढले.

‘आका’वर मोका नाही

वाल्मीक कराड याच्या इशाऱ्यावरूनच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप होत आहे. कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. आता सात आरोपींवर मोका लावण्यात आला आहे. त्यात वाल्मीक कराडचे नाव नाही. यासंबंधी संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगत आहेत की कोणालाही सोडणार नाही. पण मुख्य आरोपीला त्यांनी सोडले आणि इतर आरोपींना मोका लावला असा घणाघात राऊतांनी केला.

हे सुद्धा वाचा

हीच तर भाजपाची कामाची तऱ्हा

मुख्य आरोपीला सोडून इतरांना मोका लावण्यात आला आहे, असे सांगत त्यांनी भाजपाला चांगलेच सुनावले. हीच भाजपाची राज्य करण्याची पद्धत असल्याचे ते म्हणाले. मुख्य आका तसाच कायम ठेवायचा आणि त्याच्या खालची जी माणसं आहेत. त्यांच्यावर कारवाई करायची. बीड जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यात जे घडलं आहे. ते अत्यंत धक्कादायक आहे. आपण सामनामध्ये याविषयी भाष्य केल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री वारंवार न्याय आणि सत्य याची भाषा करतात. कोणाला सोडणार नाही, खपवून घेणार नाही, असं सांगतात. पण त्यांनी खपवून घेतलेले अनेक नेते आणि लोकं त्यांच्या बाजूलाच बसल्याचा टोला राऊतांनी फडणवीस यांना लगावला.

वाल्मीक कराड काही दिवसात बाहेर येईल

पण मुख्यमंत्र्यांनी वाल्मीक कराड याला खपवून घेतले आहे, असा चिमटा राऊतांनी काढला. जे लहान मासे आहेत ते कापलेले आहेत. जो मोठा मासा जाळ्यात अडकून ठेवला आहे. तो वाल्मीक कराड येत्या काही दिवसात बाहेर येईल. त्याच्यावर साधा खंडणीचा गुन्हा दाखल आहे. इतर कोणता गुन्हा आहे? असा सवाल करत त्यांनी कोण कोणाला वाचवत आहे, ते दिसत असल्याचे सांगितले.

'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.