Sanjay Raut : ‘राहुल गांधी यांच्यावर होऊ शकता हल्ला, परदेशात रचल्या जात आहे कट’, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut Big Statement : 'एक तर मी तरी राहीन नाही तर तू तरी राहाशील', या मोठ्या वक्तव्यानंतर आता राज्यात संजय राऊत यांच्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. राहुल गांधी यांच्यावर हल्ला होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.

Sanjay Raut : 'राहुल गांधी यांच्यावर होऊ शकता हल्ला, परदेशात रचल्या जात आहे कट', संजय राऊतांचा खळबळजनक दावा
राहुल गांधी यांच्यावर होऊ शकतो हल्ला
Follow us
| Updated on: Aug 02, 2024 | 4:27 PM

सध्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. आरोप-प्रत्यारोपावरुन राजकारणी हातघाईवर आले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी मोठा दावा केला. त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांविरोधात हल्ल्याचा कट रचल्या जात असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. परदेशात हा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला.

विरोधक पण तयार

राहुल गांधी लोकसभेत सध्या केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी हे सरकारला आरसा दाखवत असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. त्यामुळेच त्यांना पुन्हा कारवाईचा सामना करावा लागू शकतो, पण विरोधक त्याला तयार असल्याचे राऊत म्हणाले. भाजपने बहुमत गमावले आहे, तरीही असंवैधानिक काम करणे सोडले नसल्याचा टोला त्यांनी लगावला. राहुल गांधी आणि आमच्या विरोधात कट रचल्या जात आहे. परदेशात हा हल्ल्याचा कट रचल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

हल्ल्याचा केला दावा

येत्या काही दिवसात काही घडू शकते. उद्या राहुल गांधी यांच्यावर हल्ला होऊ शकतो. त्यानंतर विरोधकांवर हल्ले होऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने पिछाडीवर टाकले आहे. राहुल गांधी यांनी या सरकारची झोप उडवली आहे. त्यामुळेच आमच्यावर गुंडांच्या मदतीने हल्ला करण्यात येऊ शकतो, असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

राज्य सरकारवर पण हल्लाबोल

विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही. या लाडक्या बहि‍णींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लाडक्या बहि‍णींचा जो उमाळा आला आहे, तो केवळ दोन महिन्यांसाठी आहे. दोन महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील. महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर उभा करतील आणि मग हे तिघेही पळून जातील असा हल्लाबोल त्यांनी केला.

मशालने भाजपच्या खुर्चीला लावली आग

बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जोरदार कामगिरी बजावत आहे. आम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार आहोत. याच मशालीने लोकसभेत भाजपच्या जागांना आग लावली. मशाल, तुतारी आणि काँग्रेसचा हात हे आमचे चिन्ह असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या धनुष्यबाण चोरांच्या हातात असल्याचा दावा त्यांनी केला.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.