Sanjay Raut Ed Enquiry : संजय राऊतांची 6 तासांपासून ईडी चौकशी सुरू, सोमय्या म्हणतात हिशोब द्यावाच लागेल…
संजत राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडली. ते निर्दोश आहेत, त्यांना आता नोटीस आली. मात्र उशिरा रात्री दिल्लीहून आदेश येतात आणि मग नेत्यांना अटक होते हे संजय राऊत यांच्या बाबतीत होणार नाही, असेही जयंत पाटील हे म्हणाले आहेत.
मुंबई : राज्यात एक दिवस आधीच मोठं सत्तांतर झालं असतानाच शिवसेनच्या (Shivsena) भात्यातला सर्वात तीक्ष्ण बाण खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज ईडीकडून चौकशी (ED Enquiry) सुरू आहे. गोरगावमधील एका जमीन व्यवहार प्रकरणात संजय राऊतांची ही ईडी चौकशी सुरू आहे. महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांना आधीच अटक झाल्याचेही सर्वांनी पाहिलं आहे. आता राऊतांना आलेला ईडीची पेपर किती अवघड होता? हेही या चौकशीनंतरच कळेल. मात्र या ईडीच्या चौकशीनंतर पुन्हा राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांना ईडीला समोरे जावेच लागेल, त्यांना अनेक गोष्टींचा हिशोब द्यावा लागेल, असा हल्लाबोल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर संजत राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडली. ते निर्दोश आहेत, त्यांना आता नोटीस आली. मात्र उशिरा रात्री दिल्लीहून आदेश येतात आणि मग नेत्यांना अटक होते हे संजय राऊत यांच्या बाबतीत होणार नाही, असेही जयंत पाटील हे म्हणाले आहेत.
पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू
भाजपने सतत दबाव आणून, नेत्यांना ईडीची, सीबीआयची भिती दाखवूनच आपल्याकडे वळवले आहे. त्यामुळेच हे सरकार पडलं आहे. आधीही भाजपकडून असे प्रयत्न गेले आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची अटकही सुडाच्या भावनेतून झाली आहे, असा आरोप सतत महाविकास आघाडीकडून करण्यात आला. तर केंद्रीय तापस यंत्रणा या स्वतंत्र आहे. उलट दाऊदशी व्यवहार करणाऱ्यांना महाविकास आघाडी पाठीशी घालत आहे, असा पलटवार सतत भाजपकडून करण्यात आला आहे. काही दिवस शांत झालेलं शाब्दिक युद्ध ही पुन्हा राऊतांच्या चौकशीने सुरू झालं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
ईडीच्या चौकशीला जाण्याआधी संजय राऊत यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मी ईडीला पूर्ण सहकार्य करणार आहे. सुडाच्या भावनेनं हे सगळं होती. मात्र मी समर्थ आहे, मी एकटा जाईन, एकटा येईन, अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राऊतांनी दिली आहे.
संजय राऊतांवर कारवाई होणार-सोमय्या
संजय राऊतांना हे पाचवं समन्स आहे. पहिल्यांदा 72 लाख रुपये परत केले त्यात काय गडबड केली? याची तपासणी होऊन कारवाई होईल, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या हे संजय राऊत यांच्यावर आरोप करत आहेत. तर संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांचं शाब्दिक युद्धही महाराष्ट्राने पाहिलं आहे.