‘चंद्रहार पाटील हे कुस्तीमधील सचिन तेंडुलकर’; संजय राऊतांंचं पक्ष प्रवेशावेळी मोठं विधान
Sanjay Raut on Chnadrahar Patil : लोकसभा निवडणुकीआधी मोठ्या घड्यामोडी घडताना दिसत आहेत. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी ठाकरे गटामध्ये डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी प्रवेश केला आहे. सोमवारी मातोश्रीवर चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी ठाकरे गटाची तोफ असलेल्या संजय राऊत यांनी, चंद्रहार पाटील कुस्तीमधील सचिन तेंडुलकर असल्याचं विधान केलं. तर ठाकरे गटामध्ये प्रवेश केल्यावर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल सांगली सांगली जिल्ह्यातील असेल, असं वचन चंद्रहार पाटलांनी दिलं.
आपल्या मातोश्रीवर जबरदस्त पक्षप्रवेश होते आहे. याआधी मोठे नेते, अभिनेते यांचे प्रवेश झाले पण आज कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्राचं वैभव डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील प्रवेश करत आहे. सांगलीमध्ये कुस्तीचं मैदान गाजवणारे चंद्रहार पाटील हे कुस्तीतील सचिन तेंडुलकर आहेत. चंद्राहाराची गदा आता शिवसेनेच्या मशालीसोबत ताकद दाखवणार आहे. चंद्रहार यांना जिथे पाठवायचं तिथेचं पाठवलं जाणार आहे, कोणीही रोखू शकत नसल्याचं संजय राऊत यांनी म्हणाले.
आम्हाला बोलून न दाखवता करून दाखवायची सवय- पाटील
मला मनापासून आभार मानायचे आहेत, एका शेतकऱ्याचा मुलाला सांगली लोकसभेच्या दृष्टीने तुम्ही जो काही मानसन्मान दिलात त्याबद्दल मी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या मुलांचा सन्मान केला असं मला वाटत आहे. आज कुस्ती क्षेत्रात काम करत असल्यामुळे आम्हाला बोलून न दाखवता करून दाखवायची सवय आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल सांगली सांगली जिल्ह्यातील आहे. शेतकऱ्याच्या मुलाला आज आपल्या परिवारामध्ये सामील करून घेतलं त्याबद्दल तुमचे आभार, चंद्रहार पाटील म्हणाले.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकासाठी सांगली जिल्ह्यामधून चंद्रहार पाटील निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक होते. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटामध्ये ते प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर आज चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता पाटील ठाकरे गटाचे उमेदवार असल्याचं निश्चित झालं आहे.