मुंबई : राज्यात सध्या आयएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरण चांगलंच गाजतंय. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) पुन्हा आमनेसामने आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी समन्स बजावल्यापासून किरीट सोमय्या नॉट रिचेबल आहेत. तर दुसरीकडे संजय राऊत यावरून सोमय्यांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. आधी संजय राऊतांनी सोमय्या देश सोडून पळून जाऊ शकतात, अशी शंका व्यक्त केली. त्यानंतर त्यांची तुलाना नीरव मोदीशी केली. त्यानंतर पुन्हा राऊतांनी ट्विट करत, बाप बेटे जेल जायेंगे..अनिल देशमुख, नवाब मलिक के बाजुकेही कोठडी मे रहेंगे..असा टोला लगावाल आणि आता तर पत्रकार परिषद घेत पुन्हा सोमय्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. तसेच राऊतांनी भाजप नेत्यांवर टीका करत चौफेर बॅटिंग केली आहे.
त्यांनी काश्मीर फाईल चित्रपटाचा आधार घेत भाजपला टोला लगावला आहे. सोमय्या गायब आहेत, याबाबत राऊतांना विचारले असता राऊत म्हणाले, काय असणार प्रतिक्रिया, भाग सोमय्या भाग हा नवीन सिनेमा आता काश्मीर फाईलवाल्यांनी काढला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी सोमय्यांचा समाचार घेतला आहे. जर तुम्ही गुन्हा केला नाही म्हणता, घाबरत नाही म्हणता, इतरांना त्याच्या भ्रष्टाचारावरून प्रश्न विचारता, कायद्याला कोर्टाला सामोरे जा म्हणता मग तुम्ही का पळता? असा थेट सवाल राऊतांनी केला.
हा दळभद्री प्रकार देशात कधी झाला नव्हता. तुम्ही लोकांच्या देशाच्या भावनेशी खेळला आहे. विक्रांत संदर्भात देशाच्या भावना तीव्र होत्या. ज्या नौकेमुळे पाकिस्तानाचा पराभव केला. ते एक महाकाय युद्धनौका जतन करावी आणि पुढील पिढीसाठी स्मारक सर्वांची भावना होती. आम्ही राष्ट्रपतींना एकत्रं भेटलो. तेव्हा पृथ्वाराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांना विनंती केली. दुर्देवाने ते झालं नाही. असेही राऊत म्हणाले.
तसेच त्यानंतर या महाशयाने पैसे गोळा करण्यासाठी सुरूवात केली. त्याकाळातील त्यांचे ट्विट आहे. त्याने केवळ 711डबे फिरवले नाही, त्याच्याकडे जमा झालेले डबे 711 ते काही म्हणतील. ते डबे गच्च भरले. असा आरोप राऊतांनी केलाआहे. या शिवाय सेव्ह विक्रांतच्या नावावर अनेकांकडून पैसे घेतले. याच्या पावत्या नसतात. आता ते पुढे येत नाही. 58 कोटी मी सांगतो. त्यांच्या ट्विटमधून 140 कोटी ही माहिती आली. हे पैसे तेव्हा राजभवनात जमा करू अशी त्यांची भूमिका होती. तेव्हा राजभवनाच्या नावावर अकाऊंट नाही हे तेव्हा माहीत नव्हतं का? असा सालही राऊतांनी केला आहे.
Sanjay Raut : सोमय्यांबरोबर आता भाजपलाही गुन्हेगार ठरवायचे का? आता आघाडी सरकारनेच ठरवावं: संजय राऊत