“हळूहळू सगळं बाहेर येईल”; संजय राऊतांनी एकाच वाक्यात केंद्रापासून राज्यापर्यंतच्या व्यवस्थेचा घेतला समाचार….
निकाल देताना ही अटक या बेकायदेशीर असल्याचे सांगत न्यायालयानेही तशीच निरीक्षणं नोंदवली आहेत असंही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
मुंबईः माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांच्या सुखदा या घरी जाऊन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, पुढील काही दिवसात आता हळूहळू सगळं बाहेर येणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. आमदार अनिल देशमुख निष्कलंक असून त्यांना गेल्या 30 वर्षाची त्यांची कारकीर्द असल्यामुळेच त्यांची न्यायालयाने सुटका केली असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
राजकीय नेतृत्वांवर कारवाई करण्यासाठी केंद्रीय यंत्रणाचा गैर वापर केला जातो आहे. ते चुकीचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. अनिल देशमुख ते ज्या संकटातून गेले आहेत. त्यातून मीही गेलो आहे. म्हणून आज त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी त्यांची भेट घेतली आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
खासदार संजय राऊत अनिल देशमुख यांना भेटण्यासाठी आल्यानंतर त्यांनी सांगितले की, आमच्या सर्वांचं एक कुटुंब आहे.
कोणही शत्रूशी असे निर्घृण वागत नाही तसे हे लोकं वागत आहेत अशी त्यांनी यावेळी खंतही व्यक्त केली आहे. न्याय देवतेने दिलेला निकाल पाहता, लोकशाहीतील हा एक खांब खंबीर असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. न्यायालयाने निकाल देताना याबाबतची निरीक्षणं गंभीरपणे नोंदवली गेली आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.
वरुण सरदेसाई यांच्यावर झालेल्या आरोपांवरूनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांच्यावर आरोप करण्याआधी ते त्यांनी आधी ते नीट तपासून पाहावे असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला आहे. तरुण कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा हा भाजपचा डाव असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारवायांसंदर्भात भेटणार आहोत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तर आमदार अनिल देशमुख यांनी संजय राऊत भेटायला आल्यानंतर सांगितले की, संजय राऊत यांनी जे सांगितले आहे ते शंभर टक्के खरं आहे.
निकाल देताना ही अटक या बेकायदेशीर असल्याचे सांगत न्यायालयानेही तशीच निरीक्षणं नोंदवली आहेत असंही त्यांनी म्हटले आहे. माझ्यावर ज्या सचिन वाझेनी आरोप केले त्यावर विश्वास ठेवता येणार नाही असंही कोर्टाने म्हटले आहे.
आपल्यावर आरोप झाला शंभर कोटींचा आणि चार्जशीट दाखल केली त्यात वेगळी रक्कम दिसून आली आहे असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे वाझे यांनी जे आरोप केले आहेत, त्यामध्ये काही तथ्य नाही असंही अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.