न्यायदेवतेच्या डोळ्यावरची काळी पट्टी हटवली; संजय राऊत म्हणाले, यांनी…
Sanjay Raut Press Conference : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी निवडणुकीवर भाष्य केलं आहे. तसंच शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरही संजय राऊतांनी भाष्य केलं. वाचा सविस्तर...
भारतीय न्यायव्यवस्था भेदभाव करत नाही, याचं प्रतिक म्हणून न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी होती. एका हातात तराजू होता आणि एका हातात तलवार होती. पण आता यात बदल करण्यात आला आहे. आता न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची पट्टी हटवण्यात आली आहे. तसंच न्यायदेवतेच्या हातात संविधान देण्यात आलं आहे. यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. संविधान हातात घेणं भाजप आरएसएसची परंपरा आहे. न्याय देवतेच्या हातात तराजू दिला म्हणजे ते कुणालाही भेदभावाने बघणार नाही. संविधानाच्या 10 शेड्युलवर तुम्ही निर्णय घेऊ शकला नाहीत पट्टी काढून काय होणार?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
“म्हणून पट्टी हटवली”
न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन्याय करणाऱ्यांचा मुंडका उडवून टाकण्यासाठी असते. समोर किती मोठी व्यक्ती आहे ती श्रीमंत आहे की शक्तिमान आहे ते पाहून मी न्याय करणार नाही यासाठी डोळ्यावर पट्टी असते. पण गेल्या चार वर्षात असं काही न्याय झाला नाही. न्यायालयाच्या काही लोकांनी भारतीय जनता पक्षाला मदत करायचं ठरवलं आहे. उघड्या डोळ्यांनी आता भ्रष्टाचार पाहा. त्यासाठी त्यांनी न्यायदेवतेच्या हातातील तलवार काढली डोळ्यावरील पट्टी काढली, अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
न्यायालयाचं काम आहे संविधानाच रक्षण करणं. पण सर्वोच्च न्यायालयात हे होत आहे का? संविधान दिलं हातात पण संविधान तुम्ही तर संपवताय. आमच्या पक्षाने न्याय देवीचा अनुभव घेतला. असंवैधानिक सरकार सर्वोच्च न्यायालयाने डोळ्यावर पट्टी बांधून न्याय दिला नाही. संविधानाची हत्या रोज होत आहे. संविधानाचा पुस्तक हातात देऊन न्यायालय आरएसएसचा अजेंडा पसरवत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ईव्हीएम संदर्भात घोटाळा होतो परंतु तुम्ही तीन चीट दिली आहे. कायद्याचा कारभार करून विरोधी पक्षाला खतम केला जात आहे आणि हे तुम्ही सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहात हा प्रोपोगंडा आहे. तपास घेण्यासाठी किती तुम्ही घेणार आहात. याला जातीय आणि धार्मिक रंग दिला जातो या देशात मुस्लिमांनी ख्रिश्चनांनी जैन समाजाने मतदान करायचं नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.