शिंदे आणि नार्वेकरांची औकात काय?, निकालपत्र दिल्लीतून टाईप करून आलं, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

Sanjay raut on mla disqualification Result | आमदार अपात्रतेवर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र केलं आहे. मात्र शिंदे यांच्याकडे शिवसेना गेली आहे. यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना खळबळजनक आरोप केला आहे.

शिंदे आणि नार्वेकरांची औकात काय?, निकालपत्र दिल्लीतून टाईप करून आलं, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
Rahul Narvekar Sanjay raut Eknath Shinde .
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 7:43 PM

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेवर निकाल दिला आहे. उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचं सांगितलं आहे. शिंदे गटासह ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र करण्यात आलं आहे. या निर्णयावरून संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांसह भाजपवर निशाणा साधला आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना कधीच संपणार नाही, आजचा निर्णय हा काही न्याय नाही. भाजपचं हे मोठं षडयंत्र आहे. अकरा कोटी मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम मराठी माणूस राहुल नार्वेकर यांनी केलंय. ही एक मॅच फिक्सिंग आहे मी सकाळपासून बोलत होतो. श्री रामांचं नाव घेण्याचं नार्वेकर यांना अधिकार नाही. सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री शिंदे आणि नार्वेकरांवर जहरी टीका

शिंदे, नार्वेकर कोण? काय त्यांची औकात काय आहे? मराठी माणसासाठी आणि लोकशाहीमधील ही काळा दिवस आहे. इतिहास माफ करणार नाही हे शिंदेंना जावून सांग. कितीही खोके आणा, शिवसेना संपणार नाही. आजचं निकालपत्र हे दिल्लीतून टाईप करून आलं आहे. सुप्रीम कोर्ट शहाणं की आता बसलेले दीड शहाणे? विधानसभा अध्यक्ष खोटारडे पणाने वागले असून बेकायदेशीर अध्यक्षांनी बेकायदेशीर निर्णय घेतला असल्याचं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, शिवसेना कोणी स्थापन केली हे सर्वांना माहित आहे. विधीमंडळ पक्षाला कोणताही अधिकार नाही. व्हीपची निवड ही ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. बाळासाबहेबांनी ह्यात असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाचा पदभार सोपवला होता. त्यामुळे सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांची भक्कम होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिली आहे.

आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.