बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण देत संजय राऊतांचा शिंदेवर निशाणा, फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, दिल्लीचे बूट…
Sanjay Raut on CM Eknath Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत शिंदेंवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. तसंच फडणवीसांवरही निशाणा साधलाय. वाचा सविस्तर...
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांचा उल्लेख करत राऊतांनी शिदेंवर निशाणा साधला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं बोलले होते, की मी दिल्लीची लाचारी करणार नाही आणि दिल्लीचे बूट चाटणार नाही. कमळाबाईला सुद्धा मी त्याची जागा दाखवीन हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं. एकनाथ शिंदे आणि त्यांची लोक दिल्लीचे बूट चाटतात. दिल्लीचे मुजरेगिरी करत आहेत. हे सुद्धा बाळासाहेबांना मान्य नव्हतं. बाळासाहेबांनी काँग्रेसचा कधीच तिरस्कार केला नाही. बाळासाहेबांनी अनेकदा इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपर्यंत काँग्रेसला राष्ट्रहिताच्या प्रश्नासाठी पाठिंबा दिला आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. ते त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत कारण त्यांचा अस्तित्व गेल्या अडीच वर्षात पूर्णपणे संपवले आहे. महाराष्ट्र राज्याची ही निवडणूक आहे. या राज्यात सर्व सुरळीत चालले असताना फक्त भारतीय जनता पक्षाला आम्ही त्यांच्या बगलबच्चांना त्यांचा पराभव दिसत आहे. म्हणून जात धर्म हिंदू मुसलमान बोट जिहाद वगैरे वगैरे विषय त्यांनी आणले, असं म्हणत राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र डागलं आहे.
बाळासाहेब ठाकरेंची आठवण
बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. हे निवडणूक आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने नावाने लढत आहोत. कारण ज्या कार्यासाठी शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली. महाराष्ट्राचा आरक्षण मुंबईचा रक्षण, मराठी माणसाचा स्वाभिमान अभिमान हे सगळं गेलं अडीच वर्षात संकटात आहे. महाराष्ट्रावर गुजरातने ज्याप्रकारे आक्रमक केलं आणि आमचे राज्यकर्ते सध्याचे किंवा त्यांच्या कुटुंबातील काही लोक गुजरातची लाचारी करत आहेत. गुजरातच्या नवनिर्माण लागले दिल्ली प्राचार्य करत आहेत. हा विचार बाळासाहेब ठाकरे यांचा नव्हता किंवा नाही बाळासाहेबांनी आम्हाला ताट पाठीचा काना दिला. बाळासाहेबांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलं. बाळासाहेबांनी आम्हाला संकटावर मात करायला शिकवला एक वेळ लढला नाहीस तरी चालेल पण स्वतःला विकू नको या सगळ्याचे आज आम्हाला आठवण येतेय, असं राऊत म्हणालेत.
आज खरं म्हणजे 17 नोव्हेंबर बाळासाहेब ठाकरे यांचा आमच्या शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन आहे. आज संध्याकाळपर्यंत तिथे हजारो लाखो लोक येतील. त्याच्यामुळे त्या परंपरेनुसार आम्हाला ही परवानगी सभेत साठी मिळाली पाहिजे होती. परंतु आम्हाला मिळू नये म्हणून दुसरा कोणीतरी एक दिवस आधी कागद दिला. शिवसेनेला शिवतीर्थावर सभा गेल्यापासून रोखण्यात आलं. याला तुम्ही काय म्हणू शकता? याला तुम्ही जळफळाट किंवा एक विकृती हा शब्द असतो तेच म्हणावं लागेल, असं म्हणत राऊतांनी हल्लाबोल केलाय.