Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे; छत्रपतींच्या स्मारकावरून संजय राऊतांनी भाजपला घेरलं

Sanjay Raut on Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी भाजप आणि विशेष करून देवेंद्र फडणवीसांना घेरलं आहे. वाचा सविस्तर...

फडणवीसांचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे; छत्रपतींच्या स्मारकावरून संजय राऊतांनी भाजपला घेरलं
देवेंद्र फडणवीस, संजय राऊतImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 11:34 AM

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक यावरून वातावरण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. देवेंद्र फडणवीस शिवरायांच्या कार्याचे द्रष्टे आहेत. फडणवीसांचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे, अशा शब्दात संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. आमचं सरकार आलं तर ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदीर उभं करू, असं उद्धव ठाकरे काल म्हणाले. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावरून संजय राऊत आक्रमक झाले. आजच्या पत्रकार परिषदेत राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केलाय.

राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे फडणवीस यांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांची चेष्टा केली आहे. मुंब्र्यात काय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि पाकिस्तानात उभारू… या देशातील मुसलमानांना तुम्ही बदनाम करत आहात. बटेंगे तो कटिंग चालत नाही त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही अपमान करत आहात. तुमचे पूर्वज मोघलांची चाकरी करत होते. ही असली फडणवीसी महाराष्ट्रात दाखवू नका…, अशा शब्दात संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

महायुतीच्या सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला. महाराजांचा पुतळा कोसळून पडला. फडणवीसने दिल्लीच्या चरणी तो स्वाभिमान गहाण ठेवला. महाराजांपासून प्रेरणा मिळावे यासाठी प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर ओपन करावं असं उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. फडणवीस यांनी या संकल्पनेची चेष्टा केली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे, असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

राहुल गांधींबाबतच्या फडणवीसांच्या विधानावर भाष्य

देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. भारत जोडो हा समूह तयार करण्यात आला आहे. त्यात कट्टर डाव्या विचारांच्या संघटना आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांच्या या विधानाला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. तुम्हाला अफजला खानांच्या लोकांनी घेरले आहेत. फडणवीसांसारखा नतदृष्ट्या माणुस महाराजांच्या मंदीराला विरोध करतो. डरफोक माणसाचे राजकारण ED, CBI, पोलीसांचा वापर राजकारण करत आहेत. फडणवीसांकडे दुर्लक्ष करा, असं संजय राऊत म्हणालेत.

युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.