…तर भाजप पुढची 100 वर्षे सत्तेत येणार नाही; पवार-फडणवीस भेटीवर संजय राऊतांचं वक्तव्य

होय, शरद पवार यांनी फडणवीसांना सत्तेचा कानमंत्र दिला असेल. विरोधी पक्ष अशाचप्रकारे सरकारच्या कामात अडथळे निर्माण करत राहिला | Sanjay Raut

...तर भाजप पुढची 100 वर्षे सत्तेत येणार नाही; पवार-फडणवीस भेटीवर संजय राऊतांचं वक्तव्य
संजय राऊत, शिवसेना खासदार
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 10:35 AM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वैगेरे घडणार नाही, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. उलट या भेटीत शरद पवार यांनीच विरोधक सरकारच्या कामात अडथळे आणण्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचले असतील, असे राऊत यांनी म्हटले. (If BJP keep creating hurdles in Mahavikas aghadi govt work they will not get into power for 100 years says Shivsena leader Sanjay Raut)

ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांना सिल्व्हर ओक येथे झालेल्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीविषयी विचारण्यात आले. तेव्हा संजय राऊत यांनी या भेटीमुळे महाविकासआघाडी सरकार अस्थिर होण्याचा दावा फेटाळून लावला. महाराष्ट्रातील राजकीय नेते एकमेकांना अशाप्रकारे भेटत असतात, आपल्याकडे तशी परंपरा आहे. शरद पवार यांची तब्येत सध्या थोडीशी खराब आहे. त्यामुळे फडणवीसांनी सदिच्छा भेट दिली असेल, असे राऊत यांनी म्हटले.

या भेटीत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा कानमंत्र सांगितला असेल का, असा प्रश्नही राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी म्हटले की, होय, शरद पवार यांनी फडणवीसांना सत्तेचा कानमंत्र दिला असेल. विरोधी पक्ष अशाचप्रकारे सरकारच्या कामात अडथळे निर्माण करत राहिला तर पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल. शरद पवार यांनीही विरोधी पक्षनेता म्हणून काम केले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून फडणवीसांना मार्गदर्शनच मिळाले असावे, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीला इतक्या गांभीर्याने घेऊ नये

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडत आहे. ही बैठक पूर्वनियोजित असली तरी पवार-फडणवीस भेटीमुळे या बैठकीला अचानक महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, ही राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बैठक आहे. त्यामध्ये इतके विशेष असे काही नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

पाच दिवसांपूर्वी मीदेखील शरद पवार यांना भेटलो होतो. त्यापूर्वी शरद पवार यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे अशा भेटीगाठी होत असतात. प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढणे योग्य ठरणार नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस भेटीसाठी शरद पवारांच्या घरी, सिल्व्हर ओकवर भेट

झोपेत असताना सरकार जाईल, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अजित पवारांचा टोला, म्हणाले…

(If BJP keep creating hurdles in Mahavikas aghadi govt work they will not get into power for 100 years says Shivsena leader Sanjay Raut)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.