संजय राऊतांची फाईट, मुंबईतील वातावरण टाईट, सेनाभवन परिसरातील वाहतुकीबाबत काय आवाहन?
दुपारी दादरमधील शिवसेना भवन परिसरात शिवसैनिक आणि इतर राजकीय मंडळी, पत्रकार गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आधीच वाहतूक पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. या परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
मुंबई : राज्यात सध्या एकच मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे संजय राऊतांची (Sanjay Raut Press conference) होणारी पत्रकार परिषद. भाजपला (Bjp) आणि ईडीच्या (ED) कारवाईंना उत्तर देण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊतांनी रणशिंग फुंकले आहे. संजय राऊत आज दुपारी चार वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदे आधी मुंबईतील राजकीय वातावरण तर टाईट झालेच आहे. मात्र मुंबई पोलिसांनी शिवसेना भवन परिसरात तगडा बंदोबस्त लावून छावणीचे स्वरूप आणले आहे. या राजकीय कार्यक्रमाचा मुंबईतील वाहतुकीवरही ताण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारी दादरमधील शिवसेना भवन परिसरात शिवसैनिक आणि इतर राजकीय मंडळी, पत्रकार गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आधीच वाहतूक पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. या परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
पर्यायी मार्ग स्वीकरण्याचे पोलिसांचे आवाहन
काही वेळापूर्वीच मुंबई पोलिसांनी ट्विट करत, मुंबईतील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की गडकरी चौक, दादर, मुंबई येथे राजकीय कार्यक्रम असल्याने कोतवाल गार्डन ते गडकरी जंक्शन ते राजबढे चौक दोन्ही वाहिनीवर दुपारी 14.00 ते 18.00 वा पर्यंत वाहतूक संथ गतीने चालू राहू शकते. कृपया आपण नमूद वेळी पर्यायी मार्गाचा वापर करावा. असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. त्यामुळे एकदंरीतच या पत्रकार परिषदेना वातावरण टाईट केल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील सुरक्षा यंत्रणाही सध्या अलर्ट मोडवर आल्या आहेत.
मुंबई पोलिसांचं ट्विट
मुंबईतील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की गडकरी चौक, दादर, मुंबई येथे राजकीय कार्यक्रम असल्याने कोतवाल गार्डन ते गडकरी जंक्शन ते राजबढे चौक दोन्ही वाहिनीवर दुपारी 14.00 ते 18.00 वा पर्यंत वाहतुक संथ गतीने चालू राहू शकते. कृपया आपण नमूद वेळी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
— Mumbai Police (@MumbaiPolice) February 15, 2022
संजय राऊत काय म्हणाले?
शिवसेना भवनात ही पत्रकार परिषद होणार असल्याने या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. शिवसेना भवनाच्या आत पत्रकारांच्या आसनाची व्यवस्था केली आहे. सेना भवनाच्या बाहेर भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. तसेच एलईडी स्क्रीनही लावण्यात आल्या आहेत. शिवाय झुकेगा नही, अशी पोस्टरबाजीही सेना भवनाच्या बाहेर करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना आज विरोधकांना करारा जवाब देणार की ही पत्रकार परिषद नुसती हूल ठरणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांनी ही शिवसेनेची पत्रकार परिषद असेल असं स्पष्ट केलं आहे. शिवसेना बोलेल आणि देश ऐकेल, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राऊत कोणता बॉम्ब टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Shiv Sena Bhavan | शिवसेना भवन परिसरात जय्यत तयारी! LED स्क्रीन सज्ज, कार्यकर्त्यांची लगबग
VIDEO | गँगस्टर छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रुट ईडीच्या ताब्यात, छापेमारीदरम्यान कारवाई