Sanjay Raut : शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचीच! संजय राऊतांनी पुन्हा बंडखोरांना ठणकावलं

मी नाराज नाही, जो पक्षाचा निर्णय असेल, त्याला माझा पाठिंबा असेल. मी नाराज असल्याच्या बातम्या कुणीही चालवू नये. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील आणि त्या निर्णयाच्या मागे सर्व खासदार उपस्थित राहतील, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

Sanjay Raut : शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचीच! संजय राऊतांनी पुन्हा बंडखोरांना ठणकावलं
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 6:29 PM

मुंबई : शिवसेना (Shivsena) ही उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची आहे, दुसऱ्या कुणाचीही नाही. पदावर ठेवण्याचे आणि हटवण्याचे अधिकारही त्यांचेच आहेत, असे ठाम मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मांडले आहे. ते मुंबईत बोलत होते. शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सर्व खासदारांची शिवसेनेतर्फे पहिल्यांदाच बैठक बोलावण्यात आली होती. संजय राऊत म्हणाले, की बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे आमचे सर्वांचेच गुरू होते. तसे गुरू लाभणे हे आमचे भाग्य आहे. त्यांनी दिशा दाखवली. त्यांनी पुढे नेले. त्यांनी शिवसेना निर्माण केली. या गुरूला मानवंदना देणे हे आमचे कर्तव्य आहे. उद्धव ठाकरे आता शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत. तेही आता गुरूस्थानी आहेत. जे नेतृत्व करतात ते गुरूस्थानी आहेत, असे ते म्हणाले.

‘श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी हे दोनच खासदार गैरहजर’

बैठकीविषयी संजय राऊत म्हणाले, संजय मंडलिक दिल्लीत आहे. त्यांनी कळवले होते हजर न राहण्याबाबत तसेच इतर खासदारांनीही सांगितले होते. श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी हे फक्त दोन खासदार बैठकीला उपस्थित नव्हते. बैठकीत सर्व विषयांवर चर्चा झाली. राष्ट्रपती निवडणुकींबाबतही चर्चा झाली. शिवसेनेने राजकारणाच्या पलिकडे जाऊन राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला आहे. सर्व खासदारांनी निर्णय घेण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना दिला आहे. त्यांचा आदेश बंधनकारत आहे, असेही त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले संजय राऊत?

‘मी नाराज नाही’

मी नाराज नाही, जो पक्षाचा निर्णय असेल, त्याला माझा पाठिंबा असेल. मी नाराज असल्याच्या बातम्या कुणीही चालवू नये. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील आणि त्या निर्णयाच्या मागे सर्व खासदार उपस्थित राहतील, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. राष्ट्रपतीपदाची निवडणूक तसेच शिवसेनेने भाजपासोबत जाण्याचा शिवसेना खासदारांचा सूर यावरून संजय राऊत नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे असल्याचेही ते म्हणाले.

Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.