VIDEO: कर्नाटक सरकारचा रिपोर्ट खोटा, आघाडी सरकार गप्प का?; संजय राऊतांचा ठाकरे सरकारला संतप्त सवाल

बेळगावात 15 टक्के मराठी भाषिक असल्याचा कर्नाटकच्या जनगणनेत अजब निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. (sanjay raut reaction on karnataka government census of Belgaum Marathi people)

VIDEO: कर्नाटक सरकारचा रिपोर्ट खोटा, आघाडी सरकार गप्प का?; संजय राऊतांचा ठाकरे सरकारला संतप्त सवाल
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 11:20 AM

मुंबई: बेळगावात 15 टक्के मराठी भाषिक असल्याचा कर्नाटकच्या जनगणनेत अजब निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. कर्नाटक सरकारचा हा संपूर्ण रिपोर्ट खोटा आहे. त्यावर महाराष्ट्र सरकार भूमिका का घेत नाही? राज्य सरकार गप्प का?, असा संतप्त सवालच संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी थेट ठाकरे सरकारलाच घरचा आहेर दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा संताप व्यक्त केला. बेळगावात मराठी माणूस अल्पसंख्याक आहे. बेळगावात 15 टक्के मराठी माणसं आहेत असं कर्नाटक सरकार म्हणत असले तरी ते अत्यंत धादांत खोटं आहे. यात काही तरी डाव आहे. हा रिपोर्ट संपूर्ण खोटा आहे. आणि आम्ही त्याचा निषेध करतो. खरं तर महाराष्ट्र सरकारने त्यावर भूमिका घ्यायला हवी. राज्य सरकार या संदर्भात का गप्प बसलंय हे मला कळत नाही, असा संताप व्यक्त करतानाच राज्य सरकारने सीमा भागासाठी दोन मंत्री नेमले आहेत. समन्वयक. आधी चंद्रकांत पाटील होते. आता एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ आहेत. या दोन्ही मंत्र्यांनी तात्काळ तिथे जाऊन या संदर्भात सीमाभागातील नेत्यांशी चर्चा करणे गरजेचं आहे. पण महाराष्ट्र सरकारला या संदर्भात पाऊल टाकावसं वाटत नसेल तर दुर्देव आहे. मी नक्कीच त्या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलेल, असं राऊत म्हणाले.

एकीकरण समितीच बेळगावमध्ये नंबर वन

बेळगाव महापालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला. मराठी माणसात फाटाफूट घडवून त्यांचा पराभव करण्यात आला. तरीही मराठी उमेदवारांना पडलेली मतं ही भाजपच्या उमेदवारांपेक्षा जास्त आहे. मराठी उमेदवारांना 67 हजार मते पडली आहेत. भाजपला 44 हजार मते पडली आहे. मतांच्या संख्येत काँग्रेस दोन नंबरला आहे. एक नंबरला महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व उमेदवार आहेत. पण तिसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप सत्तेत आहे. त्याला काही कारणं आहेत, असं त्यांनी सांगितलं.

मराठी टक्का कमी करण्याचा प्रयत्न

कर्नाटकात तेव्हा सुरू झालेलं आंदोलन अजूनही सुरू आहे. आंदोलन संपलेलं नाही. त्यावेळी बेळगाव, कारवार निपाणी भालकीसह जवळ जवळ 65 पेक्षा जास्त गावांचा प्रश्न होता. तेव्हाच्या सीमाभागात 60 टक्के ते 65 टक्के मराठी बांधव होते. आजही ती संख्या तेवढीच आहे. फक्त कर्नाटकने या संपूर्ण भागाचं कानडीकरण केलं. बेळगावला उपराजधानी केली. तिथे व्यापार वाढवला. तिथे अनेक मराठी लोकांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. अशा तऱ्हेने मराठी टक्का कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी. तरीही आजही सीमाभागातील बहुमत मराठीच आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ममतादीदी विजयी होणार, इतरांचं डिपॉझिट जप्त होणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत उभ्या आहेत. या मतदारसंघात मतमोजणी सुरू आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी या विजयी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भवानीपूरमध्ये सर्वांचं डिपॉझिट जप्त होणार आहे. भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी रेकॉर्ड मतांनी विजयी होतील. भवानीपूर हा त्यांचा परंपरागत गड आहे. मागच्या वेळेला दुसऱ्या मतदारसंघात त्या आव्हान स्विकारून लढल्या होत्या. त्याची याचिका कोर्टात आहे. पण ममता दीदी जिंकतील. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

‘बेळगावात 15 टक्के मराठी भाषिक’ कर्नाटकच्या जनगणनेत अजब निष्कर्ष, या विरुद्ध कोर्टात जाणार, सतेज पाटील यांची भूमिका

रामदास कदमांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी माहीत नाही, पण शिवसेनेत मोठी खदखद: देवेंद्र फडणवीस

कोण महेश मांजरेकर, चित्रपसृष्टीत त्यांचं काय योगदान; ‘गोडसे’ चित्रपटाच्या घोषणेनंतर जितेंद्र आव्हाड संतापले

(sanjay raut reaction on karnataka government census of Belgaum Marathi people)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.