मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याविरोधात पुन्हा चागलेच आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राऊत आयएनएस विक्रांतचा मुद्दा (INS Vikrant) उचलून धरत राऊतांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलाग नील सोमय्या यांनी यात मोठा घोटाळा केला आहे. असा थेट आरोप संजय राऊतांकडून करण्यात येत आहे. या घोटाळ्याचे मी पुरावे दिले आहेत, असा दावाही राऊतांकडून करण्यात येत आहेत. याच आरोपांवरून त्यांनी पुन्हा एकादा राज्यपाल यांनाही टार्गेट केले आहे. आज शिवसेनेने राज्यभर आंदोलन केले आहे. आयएनस विक्रांतबाबत जो घोटाळा झाल आहे त्याविरोधात हे आंदोलन आहे, असे राऊतांनी सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा राजकारण तापलं आहे.
किरीट सोमय्यांना संजय राऊतांनी पुन्हा ऑन कॅमेरा शिवी दिली आहे. तसेच किरीट सोमय्यांनी पैसे गोळा केल्याचे स्पष्ट दिसतंय. मुलगा आणि दोघे मिळून 711 डबे गोळा केले. हे सर्व पैसे त्यांनी लाटले. राज्यभवन ही भाजपची शाखा आहे. राज्यपाल हे त्यांचे शाखाप्रमुख आहेत, असे म्हणत त्यांनी राऊत. राज्यपालांनी मला पत्र दिलं हे पैसे आम्हाला मिळाले नाहीत म्हणून, मग हे पैसे गेले कुठे? याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे थेट आव्हान देत राऊतांनी आरोप केले आहेत. राजभवनात जाऊन जे रोज खिचडी खात आणि पत्ते खेळत बसतात त्यांनीच पुरावे दिले. हा देशद्रोहा सारखा मोठा गुन्हा आहे. आज राज्यसभा या विषयावर बंद पडली. आम्ही प्रश्न विचारले त्यावेळी भाजपचे खासदार गप्प बसले, असेही ते म्हणाले.
तसेच त्यांच्यावरील कारवाईबाबत बोलताना, हा जनतेचा संपात आहे, हळूहळू वातावरण आणखी तापणार, असा इशारा त्यांनी दिली. तसेच शिवसेनेचा वाघ शांत दिसतो याचा अर्थ आम्ही काही करत नाही असा नाही. एका मर्यादेपर्यंत संयम पाळला आहे. तुम्ही नामर्द आहात, असे पाठीमागून वार करू नका, आम्ही असे अनेक वार पचवले, अशा कारवाईंने सरकार पडणार नाही, आम्ही गुडघे टेकणार नाही, तसाच विचार तुम्ही करत असाल तर तुम्ही मुर्खासारखा विचार करत आहात, असा म्हणत त्यांनी भाजवर हल्लाबोल चढवला आहे. मी शरद पवारांचा माणूस आहे हे लपून राहिलं का, म्हणूनच मी सरकार आणू शकलो, माझ्यासाठी पवार मोदींना भेटले हे सर्वांना माहिती आहे, असेही राऊत म्हणाले.