Bhavana Gawli : संजय राऊतांनी निर्दोषत्व कोर्टात सिद्ध करावं, मीही तेच केलंय, नेमकं काय म्हणाल्या, खासदार भावना गवळी…
ग्रामीण शिवसेनेतून भावना गवळी यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केल्या जात आहे. शिंदे यांना समर्थन देण्यासाठी शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.
मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्ते काल मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांना समर्थन देण्यासाठी गेले आहेत. मुंबईत भावना गवळी म्हणाल्या, देवेंद्र फडणवीसांनी खूप मोठं मनं केलं. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं. एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार आहोत. हजारोच्या संख्येनं समर्थक सत्कार करणार आहेत. ईडी प्रकरणात मला कोर्टानं क्लिनचीट (Cleancheat) दिली. ईडीचा विषय आता माझ्यासाठी संपला आहे. देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना थेट भेटली. त्यांना माझी हकिकत सांगितली. कुठल्याही गोष्टीला क्लीनचीट देण्यासाठी कोर्ट (Court) आहे. ईडीची कारवाई विशिष्ट पद्धतीनं होत असते. संजय राऊत निर्दोष असतील कोर्टातं सिध्द करावं, मीही तेच केलं, असं भावना गवळी यांनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ
शिंदे गटाला दिलं समर्थन
तब्बल एका महिन्याच्या सत्ता नाट्यानंतरही शिवसेनेच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. वाशीम- यवतमाळ लोकसभेच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांनी शिंदे गटाला समर्थन दिले. त्यानंतर वाशीम जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. पाच टर्म खासदार राहलेल्या भावना गवळी यांचा ग्रामीण भागात दांडगा संपर्क आहे. ग्रामीण शिवसेनेतून भावना गवळी यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केल्या जात आहे. शिंदे यांना समर्थन देण्यासाठी शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.
शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल
वाशीम जिल्ह्यातून शिवसेनेचा एक गट काल सायंकाळी भावना गवळी यांच्या समर्थनार्थ मुंबईकडे रवाना झाला. आजी माजी पदाधिकारी आणि शाखा पातळीवरील शिवसैनिकांचा यात समावेश आहे. महादेव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले. वाशीमहून 9 खाजगी ट्रॅव्हल्सद्वारे व इतर वाहनांनी हजारो शिवसैनिक मुंबईला रवाना झाले. खासदार भावना गवळी याच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यासाठी शेकडो भावना गवळी यांचे समर्थक मुंबईत रवाना झाले आहेत.