VIDEO: गोव्यात शांतता फोन टॅपिंग सुरू आहे, गोव्यातही फोन टॅपिंगचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’; संजय राऊत यांचा हल्लबोल

ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या ठिकाणी फोन टॅपिगंचा पॅटर्न राबवला जात आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भेटले होते. त्यांनीही त्यांचे फोन टॅप केले जात असल्याची भीती व्यक्त केली होती.

VIDEO: गोव्यात शांतता फोन टॅपिंग सुरू आहे, गोव्यातही फोन टॅपिंगचा 'महाराष्ट्र पॅटर्न'; संजय राऊत यांचा हल्लबोल
गोव्यात शांतता फोन टॅपिंग सुरू आहे, गोव्यातही फोन टॅपिंगचा 'महाराष्ट्र पॅटर्न'
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 11:05 AM

मुंबई: ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या ठिकाणी फोन टॅपिगंचा पॅटर्न राबवला जात आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (digambar kamat) भेटले होते. त्यांनीही त्यांचे फोन टॅप केले जात असल्याची भीती व्यक्त केली होती. काल त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. मी त्यांना सांगितलं तुमचेच फोन टॅपिंग होत नाहीत तर सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाई हे प्रमुख पक्षांचे नेते आहेत त्यांचेही फोन टॅप होत आहेत. फोन टॅपिंगचा कार्यक्रम उत्तम प्रकार सुरू आहे. गोव्यात शांतता फोन टॅपिंग सुरू आहे. हा महाराष्ट्र पॅटर्न आहे, अशी टीका करतानाच महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते तेच निवडणूक काळात गोव्याचे प्रमुख होते, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना नाव न घेता लगावला. आम्ही काळजी घेत आहोत. तसेच दिगंबर कामत यांच्यासोबत आम्ही आहोत, असं त्यांना सांगितल्याचंही राऊत म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.

महाराष्ट्रात फोन टॅपिंगचा विषय परत एकदा सुरू झाला आहे. एकनाथ खडसे आणि माझे फोन टॅप होत होते. त्याबद्दल कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एक गुन्हा पुणे बंडगार्डनला दाखल झाला आहे. निवडणुकीनंतर ज्या हालचाली सुरू होत्या. त्यावेळी ही फोन टॅपिंग झाले. आम्ही कुणाशी बोलतो, कुणाला भेटतो, काय करतो ही माहिती त्यावेळच्या पोलीस अधिकारी कुणाला देत होते हे सर्वांना माहीत आहे, असं संजय राऊत म्हणाले.

केबीजी, सीआयएलाही आणा

त्यांना एखाद्या राज्यात सत्ता आणायची असेल तर राज्यपाल, फोन टॅपिंग, केंद्रीय तपास यंत्रणा यातून राजकारण केलं जातं. हे सर्व वापरून तुमची सत्ता येत नसेल तर केबीजी आणि सीआयएही आणा, असा हल्लाही त्यांनी चढवला.

गोव्यातही केंद्रीय यंत्रणा जातील

महाराष्ट्रात जे चाललंय ते निकालानंतर गोव्यात सुरू होणार. 10 मार्च नंतर त्रिशंकू विधानसभा आली तर केंद्रीय यंत्रणा गोव्यात सुद्धा जातील, असा दावाही त्यांनी केला. गोव्यात भाजप सत्तेत येणार नाही. आम्ही पहिल्या दिवसांपासून सांगतोय. फोन टॅपिंग ही त्यांची पूर्व तयारी आहे. त्यांनी या पूर्वी महाराष्ट्रातही अशा प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. इतर राज्यातही करतील. पण त्यांना यश मिळणार नाही, असंही ते म्हणाले.

जे ऐकायचं ते ऐका

केंद्रीय तपास यंत्रणा माझे फोन आताही टॅप करत आहे. पण मी माझा नंबर बदलेला नाही. तोच आहे आणि तोच फोन मी वापरतो. माझं जे काही ऐकायचं आहे, ते त्यांना ऐकू द्या, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

BMC Elections | मुंबई मा जलेबी ने फाफडा… भाजपची वोटबँक फोडण्यासाठी शिवसेनेचं ग्रँड मिशन यशस्वी ठरणार का?

Maharashtra News Live Update : एसटी कर्मचाऱ्यांना रुजू होण्यासाठी शासनाकडून १० मार्चपर्यंत मुदत

नागपूर मनपा निवडणूक, भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती, काँग्रेस-राष्ट्रवादीची स्थिती काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.