त्यांच्या अदानी नावाच्या ‘होली काऊ’ला मिठ्या; संजय राऊत यांची सडकून टीका

मराठवाड्यात आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. अनेक घटना घडत आहेत. याचं कारण सरकारचं अस्तित्व दिसत नाही. मंत्रिमंडळ काम करत नाही.

त्यांच्या अदानी नावाच्या 'होली काऊ'ला मिठ्या; संजय राऊत यांची सडकून टीका
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 11:44 AM

मुंबई: केंद्र सरकारने येत्या 14 फेब्रुवारी रोजी काऊ हग डे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यांची होली काऊ म्हणजे अदानी आहे. त्यांनी अदानीला हग केलं आहे. एवढ्या मोठ्या काऊला हग केल्यानंतर दुसरं काही राहिलं नाही. आमच्यासाठी या गायी सोडल्या आहेत. त्यांनी आम्हाला गायी दिल्या मिठ्या मारायला. ते अदानी नावाच्या होली काऊला मिठ्या मारत आहेत, अशी टीका करतानाच पण गाय ही गोमाता आहे. त्या गोमातेचा आम्ही आदर करतो, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अराजक आणि अनागोंदी सुरू आहे. रोज आमदार आणि लोकप्रतिनिधी सोडा, सामान्य जनता, व्यापारी वर्ग आणि महिलावर्ग भीतीच्या सावटा खाली आहे.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरे यांच्याबाबत मराठवाड्यात प्रकार घडला. पोलीस कितीही सारवासारवा करत असली तरी घटना घडली. हा विषय कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित आहे, असं संजय राऊत म्हणाले.

तेही दिवस ढकलत आहेत

मराठवाड्यात आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. अनेक घटना घडत आहेत. याचं कारण सरकारचं अस्तित्व दिसत नाही. मंत्रिमंडळ काम करत नाही. गृहमंत्री फडणवीस यांनी आधीचा आपला कार्यकाळ आठवावा. त्याची आणि आताच्या कार्यकाळाची तुलना करावी. तेही बहुतेक दिवस ढकलत आहेत. त्याचा फटका जनतेला बसत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

षडयंत्र रचलं जातंय का?

विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी भीतीच्या सावटाखाली आहे. ज्या पद्धतीने विरोधकांची सुरक्षा काढून घेतली. त्यामागे या सरकारचा डाव तरी काय आहे? काही मोठं कारस्थान षडयंत्र रचलं जातंय काय? विरोधी आमदार, खासदारांवर जीवघेणे हल्ले व्हावे आणि त्यातून दहशत निर्माण व्हावी असं तर काही ना. कारण चित्रं तसंच दिसत आहे, असा दावाही त्यांनी केला.

दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

मिंधे गटाचे आमदार, भाजपात जाणाऱ्या लोकांच्या मागे पुढे सुरक्षारक्षकांचा लवाजमा आहे. तो असावा. पण इतरांना संरक्षण का दिलं जात नाही. गृहमंत्र्यांनी वेळीच पावलं उचलली नाही तर त्याचा फटका त्यांना बसू शकतो. शिवसेना फोडली. सरकार पाडलं. तरीही सरकार नीट चालत नाही.

जनमताचा रेटा शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. प्रचंड गर्दी उसळत आहे. हे पाहिल्यावर त्यांच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळेच दहशत, हल्ले करून, रक्तपात करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असावा, असंही ते म्हणाले.

नाणार रिफायनरीला विरोध करणाऱ्या पत्रकारावर हल्ला झाला. त्याचा आरोप भाजपच्या लोकांवर आहे. यातील सत्य अत्यंत खतरनाक आहे, असा दावा त्यांनी केला.

मी कुणाला घाबरत नाही

मी कुणाला घाबरत नाही. घाबरणारा नाही. मी शिवसेनेचा असा नेता आहे जो कायम टार्गेटवर राहिलो आहे. त्याचे पुरावे सरकारकडे आहे. पण सरकारने एका झटक्यात सुरक्षा काढली. मी कुणाकडे तक्रार केली नाही. कारण यामागे राजकारण आहे. जे लोक 50-50 खोके घेऊन पक्ष सोडून गेले. त्यांच्यामागे पुढे दोन दोन गाड्या सुरक्षा आहे. हे जनता पाहत आहे, असंही ते म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.