सूर्य चंद्राचे ज्ञान शिकवू नका, संजय राऊतांनी बेळगावप्रश्नावरुन कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले
संजय राऊत यांनी सूर्य-चंद्र राहीलच आम्हाला इतरांकडून ज्ञान घेण्याची गरज नाही, त्यांनी त्यांचं पाहावं, असा टोला सवदी यांना लगावला. Sanjay Raut slams Karnataka Deputy Chief Minsiter Laxman Savadi over statement on Belgaon
मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव आणि सीमाभागातील मराठी भाषिक गावांसदर्भात केलेल्या वक्तव्यावरून टीका केली आहे. संजय राऊत यांनी सूर्य-चंद्र राहीलच आम्हाला इतरांकडून ज्ञान घेण्याची गरज नाही, त्यांनी त्यांचं पाहावं, असा टोला सवदी यांना लगावला. बेळगावातील सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे, असंही संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut slams Karnataka Deputy Chief Minsiter Laxman Savadi over statement on Belgaon)
बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांची लढाई 60 वर्षांपासून सुरू आहे. ही आमच्या हक्काची लढाई आहे. सीमाभागातील जनतेच्या हक्कांची आणि अधिकाराची लढाई आहे. बेळगाव आणि सीमाभागातील जनतेला महाराष्ट्रात यायचं असेल तर त्यांच्या भावनेचा आदर केला पाहिजे. महाराष्ट्रात येऊ दिलं पाहिजे.
कन्नड भाषिक लोक केरळ, आंध्रप्रदेशात असतील तर त्यांना कर्नाटकमध्ये जायचं असेल तर त्यांच्या भावनेचा आदर केला पाहिजे. देश एक आहे आणि राहील, सीमाभागातील जनतेची लढाई देशविरोधी नाही. भाषावार प्रांतरचना बनवली आहे. तर मराठी भाषिकांना त्यांच्या राज्यात जायचं असेल तर तेथील जनतेच्या भावनेचा विचार न्यायालय, सरकारनं केला पाहिजे. असं संजय राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी LIVE https://t.co/RQFnsHcZEf
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 1, 2020
कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. असं वक्वव्य केलं. ‘जोपर्यंत सूर्य, चंद्र असले तोपर्यंत बेळगाव महाराष्ट्राला मिळणार नाही’, अशी मुक्ताफळे सवदी यांनी उधळली.
सवदी यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘चंद्र-सूर्य कशाला, तुमच्या उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल’ अशी चपराक मुश्रीफ यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सवदी यांना लगावली.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा सीमाभागातील जनतेला पाठिंबा
बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात १ नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जातो. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ यंदा १ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज पाहणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपल्या हाताला काळी फित बांधून कामकाजाला सुरुवात केली.
संबंधित बातम्या:
बेळगावात काळा दिवस पाळण्यास मराठी भाषिकांना मज्जाव, शिवसेना कार्यालयाबाहेर कानडी पोलिसांची दमदाटी
(Sanjay Raut slams Karnataka Deputy Chief Minsiter Laxman Savadi over statement on Belgaon)