Sanjay Raut: हिंदू धर्मात फूट पाडून दंगली घडवण्याचा प्रयत्न; संजय राऊत यांचा मनसेवर आरोप

Sanjay Raut: कायद्याचं राज्य चालतं. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आहेत. त्यानुसार काम होत असतं.

Sanjay Raut: हिंदू धर्मात फूट पाडून दंगली घडवण्याचा प्रयत्न; संजय राऊत यांचा मनसेवर आरोप
संजय राऊत राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार, शिवसेनेच्या भात्यातून पहिला बाण बाहेरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 10:56 AM

मुंबई: लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी मनसेवर (mns) गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा मुद्दाच नाही. तणाव निर्माण करण्याचा दंगे घडवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. पण हा मुद्दा उठलाच नाही. प्रश्नच येत नाही. गृहमंत्र्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण असावं. देशभरात ते लागू करावं. इथे जात आणि धर्माचा विषय येत नाही. मशिदीवरील (masjid) भोंग्याचा विषय ज्यांनी काढला. त्याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रात हिंदू मंदिरांना बसला. भजन, कीर्तन करणाऱ्या मंडळांना बसला. या भूमिकेवर सर्वात जास्त नाराज हिंदू समाज आहे. त्यांनी हिंदू समाजातच फूट पाडायचा प्रयत्न केला. त्यांना हिंदू धर्मात गट करून आपआपसात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच, पण सुदैवाने महाराष्ट्रात असं काही होऊ शकलं नाही. या राज्यातील जनता सुजाण आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत मीडियाशी बोलत होते. कायद्याचं राज्य चालतं. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आहेत. त्यानुसार काम होत असतं. महाराष्ट्रात शांतता आहे. संघर्ष नाही. कोणत्याही समुदायात ताणतणाव नाही. सर्व ठिक आहे. काही लोकांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. पण महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्याला उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात हे चालणार नाही. देशातही चालणार नाही. पण भोंग्याबाबतचं एक धोरण असावं. आम्ही आधीही सांगितलं आहे. संपूर्ण देशासाठी हे धोरण असावं. केंद्र सरकारला ते करावं लागेल, असंही राऊत म्हणाले.

भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही

आज स्वयंपाकाचा गॅस महागला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. महागाईवर बोलायला कोणीच तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर जाऊन आले. त्यांना युक्रेन आणि रशियातील युद्धाची चिंता आहे. त्यात ते मध्यस्थी करत आहेत. त्यांचे भक्त त्यांची वाहवा करत आहेत. पण या देशातील जनता महागाईशी युद्ध करत आहे. पेट्रोल, डिझेल, सिलिंडर, बेरोजगारी या संदर्भात भाजपचा एक तरी नेता किंवा मंत्री बोलतोय का? भोंग्यावर कसले बोलता याच्यावर बोला. सरकार म्हणून अन्न, वस्त्र, निवारा आणि महागाईवर बोलणं तुमचं कर्तव्य आहे. भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, असं राऊत यांनी भाजपला सुनावलं.

तुम्ही महागाईवर तर बोला

देशातील सर्वात मोठी समस्या महागाई आहे. केंद्रीय अर्थमंत्रीही महागाईवर बोलत नाहीत. भाजपचे राज्यातील प्रमुख नेतेही महागाईवर बोलत नाहीत. त्यांचे मुद्दे वेगळे आहेत. पंजाबचे पोलीस काय करत आहेत. महाराष्ट्रातील पोलीस काय करत आहेत. रशिया-युक्रेनचा झगडा ते पाहून घेतील. तुम्ही महागाईवर तर बोला, असं ते म्हणाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.