मुंबई : अजित पवार यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत. शरद पवार पुन्हा मैदानात उतरले. या सर्व परिस्थितीत राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी ठाकरे गटाने बैठक घेतली. या बैठकीनंतर बोलताना संजय राऊत म्हणाले, ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत राहून एकत्रित निवडणूक लढणार आहे. शिवसेनेचे भविष्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात चांगले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही एकत्रित आलेत. तुम्ही आमचे खासदार, आमदार फोडू शकाल. पण, महाविकास आघाडीचा जनाधार दिवसेंदिवस वाढत आहे.
काल शरद पवार यांनी सातारा, कराडचा दौरा केला. या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला. भाजपने राजकीय भ्रष्टाचार सुरू केलाय. त्याला लोकांचा पाठिंबा अजिबात नाही. अत्यंत भ्रष्ट इतिहास आणि जगातला अशी नोंद होईल. कुणाला शौर्य वाटत असेल, तर असे मास्टरस्ट्रोक किती हे दाखवता येईल.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आहोत. आधी आम्ही संघर्ष केला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार संघर्ष करत आहेत. हा संघर्ष काय असतो, हे अनुभवातून घेत आहोत. शरद पवार आणि त्यांचे सहकारी संघर्ष करत आहेत.
प्रत्येक संकटात महाविकास आघाडी एकत्र आहोत. शरद पवार एकटे नाहीत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. शरद पवार हे स्वतःला एकटे समजत नाही. २०२४ मध्ये आम्ही मास्टरस्ट्रोक मारू. दोन तास द्या. पाहू काय होते, ते असंही संजय राऊत यांनी सुनावलं.
एकनाथ शिंदे हे भाजपचे गुलाम आहेत. गुलाम हा गुलाम असतो. गुलामाला स्वाभिमान, अस्मिता नसते, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात बैठक झाली. राज्यात जे काही सुरू आहे,त्यावर चर्चा झाली. याला तोडा, फोडा या भाजपच्या नीतीवर चर्चा झाली. याचा राज्यावर काय परिणाम होईल, यावर चर्चा झाली. या संघर्षातून आम्हाला कसं सामोरे जाता होईल, लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांचा राज्यव्यापी टूर बनवत आहोत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.