‘देशातील मतदारांचा EVMवर विश्वास नाही, तरीपण आम्ही…’; संजय राऊतांचा निवडणुक आयोगावर निशाणा

लोकसभा निवडणुकीचं बिगुल आता वाजलं असून निवडणुक आयोगाने तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत आयोगावरही निशाणा साधलाय.

'देशातील मतदारांचा EVMवर विश्वास नाही, तरीपण आम्ही...';  संजय राऊतांचा निवडणुक आयोगावर निशाणा
Follow us
| Updated on: Mar 16, 2024 | 6:27 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या तारखा आता जाहीर झाल्या आहेत. यंदाची निवडणुक ही सात टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिलला तर शेवटचा टप्पा 1 जूनला पार पडणार आहे. निवडणुक आयोगााने तारखा जाहीर करत 97 कोटी मतदार यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत. अशातच यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना निवडणुक आयोगाला सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुल होणार आहात का? असा सवाल करत निशाणा साधला आहे.

निवडणुक आयोग सध्याच्या सत्ताोधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे अशी शंका लोकांच्या मनात आहे. उद्याच्या निवडणुका स्वतंत्र आणि पारदर्शक करत या शंकांचं निरसन करावं. कायदा सुव्यवस्था, सत्ताधाऱ्यांची ढलळाढवळ, पैशांच्या उधळपट्टीवर नियंत्रण असण गरजेचं आहे. आज लोक साशंक आहेत, त्यामुळे आज तारखा जाहीर केल्या असल्या तरी आपण स्वतंत्र आहोत हे दाखवून द्यावं. पारदर्शक निवडणुका होतील याची गॅरंटी मोदी देऊ शकत नाही, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाचं दबावाखाली काम सुरू आहे. देशातील मतदारांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. देशात पारदर्शक निवडणुका होतील याची गॅरंटी मोदी देऊ शकत नाही. मोदी आणि निवडणुका एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. देशातील मतदारांचा EVM वर विश्वास नाही. तरीपण आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे निवडणुक आयोग इतर केंद्रीय तपास यंत्रणांप्रमाणे त्यांच्या हातातील बाहुल्यासारखं वागणार आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

मविआचं जागावाटप जवळजवळ संपलं आहे. मविआतील जवळपास सर्व जागा निश्चित झाल्या आहेत. वंचितने आमच्यासोबत निवडणुका लढवाव्यात, प्रकाश आंबेडकर यांनी नेतृत्त्व करावं. राजू शेट्टी यांना मविआमध्ये घेण्याचा आमचा प्रयत्न, त्यांच्यासारखा शेतकरी नेता संसदेत हवा, संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

देशात 2 लाखाहून अधिक मतदार 100 वर्षाचे आहेत. देशात 1.82 कोटी नवीन मतदार आहेत. महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. 85 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या घरी जाऊन मतदान करुन घेणार आहोत. देशात साडेदहा लाख बुथ आहेत. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होणार आहेत. हिंसामुक्त निवडणुका घेणे ही आमची जबाबदारी आहे, अशी माहिती मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.