Nitin Desai : संजय राऊत यांनी नितीन देसाईंच्या मृत्यूचं सांगितलं कारण, सरकारकडे ND स्टुडिओबाबत मोठी मागणी

Sanjay Raut on Sanjay Raut : एका बाजूला देशातून हजारो कोटी रूपये घेऊन अनेकजण बँकांना बुडवून पळत आहेत. नितीन देसाई देश सोडून गेले नाहीत ना ते देश सोडून पळत नाही. नितीन देसाईंच्या दुर्दैवी मृत्यूनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देत सरकारकडे एक मागणी केली आहे.

Nitin Desai : संजय राऊत यांनी नितीन देसाईंच्या मृत्यूचं सांगितलं कारण, सरकारकडे ND स्टुडिओबाबत मोठी मागणी
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 10:43 AM

मुंबई : प्रसिद्ध कला-दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. नितीन देसाईंच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. (NItin Desai Death) आर्थिक विवंचनेतून त्यांनी असा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समजत आहे. नितीन देसाई यांच्यावर जवळपास व्याजासह 250 कोटींचं कर्ज झालं होतं. त्यानंतर त्यांना नोटीस आल्यावर त्यांनी अशा प्रकारचं पाऊल उचललं आणि आपली जीवनयात्रा संपवली. नितीन देसाईंच्या दुर्दैवी मृत्यूनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देत सरकारकडे एक मागणी केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

“दुर्दैवी आहे, नितीन देसाईंसारखा कला दिग्दर्शक ज्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या कतृत्त्वाचा ठसा कष्टाने आणि मेहनतीने उमटवला. या देशातील सर्वात उत्तम स्टुडिओ त्यांनी कर्जतमध्ये उभा केला होता. लगानपासून जोधा अकबरपर्यंत अशा अनेक चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली, अशा महान कलाकाराला मृत्यूला कवटाळावं लागलं. एका बाजूला देशातून हजारो कोटी रूपये घेऊन अनेकजण बँकांना बुडवून पळत आहेत. जे भाजपसोबत आहेत त्यांची कर्ज माफ होत आहेत आणि कारवाईही होत नाही. मात्र एक हरहुन्नरी मराठी माणूस ‘शे दीडशे’ रूपयाचं कर्ज आपण फेडू शकलो नाहीत. जे स्वप्न एन डी स्टुडिओच्या माध्यमातून उभं केलं ते स्वप्न माझ्यासमोर विखुरताना दिसत आहे. हे सहन न झाल्यामुळे नितीन देशाईंनी आत्महत्या केली असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.”

नितीन देसाई देश सोडून गेले नाहीत ना त्यांनी कोणाला फसवलं नाही. कर्जतचा जो स्टुडिओ आहे त्याला चित्रनगरीचा दर्जा द्यावा, कारण ते एक मराठी माणसाचं स्वप्न होतं, तुम्ही म्हणत आहात फिल्म सिटी व्हावी मग कर्जतमधील देसाईंच्या स्टुडिओला चित्रपटनगरीचा दर्जा देण्याबाबत सरकारने विचार करावा, असंही संंजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पोलिसांना ज्या Voice रेकॉर्डिंग मिळाल्या त्यामध्ये नितीन देसाई यांनी आपलं स्टुडिओ सरकाराने आपल्या ताब्यात घ्यावं, असं म्हटलं आहे. देसाईंनी एनडी स्टुडिओमध्येच स्वत: ला संपवलं, त्यांनी  ज्या ठिकाणी गळफास घेतला त्याच ठिकाणी खालील बाजूला दोरीने एक धनुष्यबाण बनवला आणि त्याच्या बरोबर टोकाच्या बाजूस गळफास घेतला. नितीन देसाई यांची बॉलिवूडमध्येही छाप होती त्यांना मात्र कर्जाच्या डोंगरापुढे आपलं स्वप्न त्यांना विखूरताना दिसत होतं. यामुळेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला असावा.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.