Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राकडून फडणवीस यांच्यावर गद्दारांची कार चालवण्याची जबाबदारी; संजय राऊत यांची खोचक टीका

राज्यातील सरकार हे खोके सरकार आहे. सध्या केरला स्टोरी वगैरे सुरू आहे. त्यामुळे द खोका स्टोरी हा सिनेमा आम्ही करत आहोत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

केंद्राकडून फडणवीस यांच्यावर गद्दारांची कार चालवण्याची जबाबदारी; संजय राऊत यांची खोचक टीका
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 10:41 AM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हायकमांड दिल्लीत आहेत. मुख्यमंत्रीही दिल्लीत हेलपाटे मारत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या काय जबाबदारी आहेत माहीत नाही. पूर्वी ते आमच्यासोबत असताना उत्तम विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर मुख्यमंत्री झाले. आता उपमुख्यमंत्री झाले. काल पाहिलं ते फुटलेल्या गटाची गाडी चालवत होते, त्यांच्यावर केंद्राने काय काय जबाबदाऱ्या टाकल्या आहेत, हे पाहावं लागेल, असा चिमटा काढतानाच फडणवीस हा फार चांगला माणूस आहे. मला त्यांची दया येते. कीव येते. त्यांना देवाने लवकरच या संकटातून सोडवावे ही प्रार्थना करतो, असा टोलाही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ते मीडियाशी बोलत होते.

अर्बन नक्षलवाद वाढत असल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तेच मुख्यमंत्री असताना भीमा कोरेगावची दंगल उसळली. तेव्हाही हाच अर्बन नक्षलवादाचा आरोप केला होता. तरीही तुम्ही अजून अर्बन नक्षलवाद मोडून काढू शकला नाही. हे तुमचं अपयश आहे. अर्बन नक्षलवाद हा तुमच्या सरकारविरोधातील बंड आहे, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

याचा विचार तुम्ही करा

तुम्ही रोजगार दिला नाही. तुमचं सरकार शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारावर काम करण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे अशा प्रवृत्ती वाढत आहेत. नक्षलवादाचा विचार समजून घ्या. तेलतुंबडे प्रकरणात कोर्टाने काय सांगितलं? वरवरा राव प्रकरणात काय सांगितलं? याचा विचार तुम्ही केला पाहिजे. खोट्या प्रकरणात तुम्ही लोकांना अडकवून त्यांना दहशतवादी आणि आर्थिक दहशतवादी ठरवत आहात, अशी टीकाही त्यांनी केली.

म्हणून भाजपची साथ सोडली

शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप केला होता. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कीर्तिकर हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी जे सांगितलं ते सत्य आहे. आमची भाजपशी युती होती, तेव्हा ते आम्हाला अशीच वागणूक देत होते. दिलेला शब्द पाळत नव्हते. केंद्रापासून ते राज्यापर्यंतची आश्वासने हवेत लटकत होती. आमच्या प्रमुख नेत्यांचा अपमान केला जात होता. तसेच शिवसेनेला खतम करण्याचा डाव भाजपने आखला होता. त्यामुळेच आम्ही सावध झालो. आम्ही भाजपची साथ सोडली. ती भाजपविरोधातील चिड होती, असं संजय राऊत म्हणाले.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.