धनंजय मुंडे आणि संजय राठोड दोन्ही प्रकरणं वेगवेगळी, उगाच गल्लत करु नका: संजय राऊत

संजय राठोड यांनी प्रसारमाध्यमांसमोर का यावं? सध्या पोलिसांकडून पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाचा तपास सुरु आहे. | Sanjay Raut

धनंजय मुंडे आणि संजय राठोड दोन्ही प्रकरणं वेगवेगळी, उगाच गल्लत करु नका: संजय राऊत
संजय राऊत, शिवसेना
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 3:45 PM

मुंबई: धनंजय मुंडे आणि संजय राठोड ही दोन्ही प्रकरणे वेगवेगळी आहेत. उगाच या प्रकरणाचं तंगडं त्या प्रकरणात प्रकरणात घालू नका. संजय राठोड (Sanjay Rathod) यांची शांत बसण्याची भूमिका योग्य आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. (Sanjay Raut on Pooja Chavan suicide case)

संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबतच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी मंगळवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राठोड यांच्या प्रसारमाध्यमांसमोर न येण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. संजय राठोड यांनी प्रसारमाध्यमांसमोर का यावं? सध्या पोलिसांकडून पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यामुळे संजय राठोड शांत बसून आहेत. अन्यथा पुन्हा संजय राठोड प्रसारमाध्यमांसमोर येऊन दबाव आणतात, तपास भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे आरोप केले जातील, असे संजय राऊत यांनी म्हटले.

राठोडांच्या राजीनाम्याची माहिती चुकीची: राऊत

वनमंत्री संजय राठोडांनी राजीनामा दिल्याची माहिती माझ्याकडे नाही. त्याबाबत मुख्यमंत्री माहिती देतील. त्याबाबत मी भाष्य करणं योग्य नाही. ती माहिती चुकीची आहे, असं संजय राऊत म्हणाले.

‘विरोधी पक्षात आहोत म्हणून बेधुंद गोळीबार करणं योग्य नाही’

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात संजय राठोड यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या भाजप नेत्यांनाही संजय राऊत यांनी सुनावले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. हे प्रकरण गांभीर्याने आणि संयमाने हाताळण्याची गरज आहे. सर्व गोष्टी या कायद्याच्या चौकटीत राहूनच झाल्या पाहिजेत. विरोधी पक्षात आहात म्हणून बेधुंद गोळीबार करणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच या सर्व प्रकरणाचा शिवसेनेच्या प्रतिमेला कोणताही फटका बसणार नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

संबंधित बातम्या:

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : अरुण राठोडनेच स्थानिकांपर्यंत ऑडिओ क्लिप पोहोचवल्या

मोठी बातमी: संजय राठोड राजीनामा देण्याची दाट शक्यता; शिवसेनेत दोन गट

धनंजय मुंडे टोकाचे निर्लज्ज, बलात्काराच्या आरोपानंतरही राजीनामा दिला नाही: निलेश राणे

(Sanjay Raut on Pooja Chavan suicide case)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.