Sanjay Raut : …तर जनता माफ करत नाही, बांगलादेशातील घडामोडींवरुन संजय राऊत यांचा केंद्र सरकारला काय इशारा

Sanjay Raut on Narendra Modi : शेजारील बांगलादेशातील हिंसाचाराचे पडसाद भारतीय राजकारणाच्या पटलावर पडले आहेत. बांगलादेशातील हिंसाचारावरुन आता विरोधाकांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. संजय राऊत यांनी काय दिला इशारा...

Sanjay Raut : ...तर जनता माफ करत नाही, बांगलादेशातील घडामोडींवरुन संजय राऊत यांचा केंद्र सरकारला काय इशारा
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 10:43 AM

बांगलादेशातील हिंसाचाराचे पडसाद भारतीय राजकारणात सुद्धा दिसून आले. विरोधकांनी याप्रकरणी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. अर्थात बांगलादेशातील घटनेच्या निमित्ताने विरोधकांनी सरकारला इशारा दिला आहे. जनता रस्त्यावर उतरली तर काय होऊ शकते, याविषयीचा सल्ला विरोधक सत्ताधाऱ्यांना देत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना बांगलादेशातील घडामोडींवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी इतर विषयावर पण मतं मांडलीत.

पंतप्रधानांनी बांगलादेशाकडे लक्ष द्यावे

संजय राऊत यांनी बांगलादेशातील हिंसाचारावर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले. बांगलादेशात आगडोंब उसळला आहे. याप्रकरणी आता केंद्र सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. बांग्लादेश प्रकरणात विरोधक आता केंद्राने स्पष्ट भूमिका घेण्यासाठी आग्रही झाले आहेत. पंतप्रधान संसदेत यायला तयार नाहीत, असा आरोप राऊत यांनी केला.

हे सुद्धा वाचा

तर जनता त्यांना माफ करत नाही

इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेशची निर्मिती केली. लोकशाहीचा मुखवटा लावून देशात जी हुकुमशाही केली जाते तिथे जनता त्यांना माफ करत नाही, एवढंच हसीना यांच्याबाबत बोलता येईल. त्यांनी विरोधकांना जेलमध्ये टाकलं, त्यांनी हुकुमशाही पद्धतीने देश चालवला, त्याचा अंत अशा पद्धतीने झाला, असे मत राऊत यांनी मांडलं. त्यांनी मोदी सरकारला या घटनेवरुन चिमटा काढला.

आज उद्धव ठाकरे दिल्लीत

उद्धव ठाकरे आज दिल्लीत पोहोचत आहेत. पुढील २ दिवसात काही महत्वाच्या गाठी-भेटी आहेत. आज काँग्रेसचे काही प्रमुख नेते त्यांना भेटायला येणार आहेत. मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांची देखील ते भेट घेणार आहेत. आज संध्याकाळी ते दिल्लीतील मराठी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय खासदारांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.८ तारखेला उपराष्ट्रपती यांनी त्यांना ब्रेकफास्ट साठी बोलावलं आहे ते तिकडे जातील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

प्रकाश आंबेडकरांना टोला

ते म्हणत असतील की शिंदेची शिवसेना खरी आहे तर प्रकाश आंबेडकर यांना कायद्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. आम्ही जर म्हंटल रामदास आठवले यांचा पक्ष खारा आहे तर त्यांना किती वेदना होतील ? असा टोला राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला. लोकशाही आहे त्यामुळं त्यांना उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार आहे. त्यांनी लोकसभेला भाजपला पाठिंबा दिला होता. आता ते कोणासोबत आहेत हे शोधावं लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी मनसेच्या निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर दिली.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.