Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: वर्षा संजय राऊत यांचे ईडीला पत्र, हजेरीसाठी अधिक वेळ देण्याची मागणी

वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून (PMC Bank Scam) संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस (ED Notice) पाठवली होती. | Varsha Sanjay Raut

मोठी बातमी: वर्षा संजय राऊत यांचे ईडीला पत्र, हजेरीसाठी अधिक वेळ देण्याची मागणी
वर्षा संजय राऊत यांना कोरोनाची लागण
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 9:15 AM

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) या मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) चौकशीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती पुढे येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वर्षा राऊत यांनी सोमवारी रात्रीची ईडीला यासंदर्भात पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी चौकशीला हजर होण्यासाठी अधिकचा अवधी हवा असल्याचे म्हटले आहे. तेव्हा आता ईडी त्यांची ही विनंती मान्य करणार का, हे पाहावे लागेल. (Sanjay Raut wife Varsha Raut seeks more time from ED)

वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून (PMC Bank Scam) संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस (ED Notice) पाठवली होती. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगण्यात आले होते.

यापूर्वी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनीही ईडीच्या चौकशीला हजर राहण्यापूर्वी अशाप्रकारे वेळ मागून घेतली होती. त्यावेळी प्रताप सरनाईक यांनी आपण बाहेरगावहून आल्यामुळे क्वारंटाईन असल्याचे कारण पुढे केले होते. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यावर आपण चौकशीसाठी येऊ, असे सरनाईक यांनी म्हटले होते. ईडीने त्यांची ही विनंती मान्य करत त्यांना तीन दिवसांचा अवधी देऊ केला होता.

वर्षा राऊत यांना नोटीस का?

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली.

संजय राऊतांचा हल्लाबोल

गेल्या दीड महिन्यापासून ईडी आमच्याकडे पत्रव्यवहार करत आहे. त्यांना काही माहिती, कागदपत्रं हवी आहेत. ती कागदपत्रे आम्ही वेळोवेळी पुरवली. पण गेल्या तीन महिन्यात त्यांनी काहीही शंका व्यक्त केली नाही. भाजपची माकडं कालपासून उड्या मारत आहेत, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला होता.

गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणं, कारवाई करणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणं असं लोकांनी गृहित धरलं आहे. सत्तेतील राजकीय पक्षाला, केंद्रातल्या किंवा राजकीय विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही. त्यामुळे ईडी, सीबीआय सारखी हत्यारे वापरावी लागतात, असंही राऊत म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

Varsha Sanjay Raut | वर्षा संजय राऊत यांची ईडी चौकशी का? वाचा सविस्तर

23 लाखाचे दागिने, पालघर, अलिबागमध्ये जमिनी, PNB मध्ये 5 खाती, वर्षा राऊतांची प्रॉपर्टी किती?

सामनाच्या अग्रलेखात ना ईडी ना भाजपा तर चक्क कॉंग्रेस, वाचा सविस्तर बातमी

(Sanjay Raut wife Varsha Raut seeks more time from ED)

'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी.