संजय राऊत यांना बेळगावात अटक होणार?, संजय राऊत यांना नेमकं काय वाटतं
आम्ही लपूनछपून जाणार नाही. आम्ही कोल्हापूरच्या रस्त्यानं जाऊ, असंही राऊत यांनी सांगितलं.
मुंबई – महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नावर दोन्ही राज्य आमनेसामने आलेत. आता संजय राऊत यांना बेळगावच्या कोर्टानं समन्स बजावले. एक डिसेंबरला बेळगाव कोर्टात हजर होण्याचे समन्स संजय राऊत यांना बजावण्यात आले. ३० मार्च २०१८ ला बेळगाव येथे प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. तर बेळगावमध्ये माझ्यावर हल्ला करून अटक करण्याचा डाव आहे. अशी शंका राऊत यांनी व्यक्त केली आहे. जे लढणारे लोकं आहे. त्यांना वारंट पाठविलं जातं. अटकेची भीती दाखविली जाते. शिवसेना घाबरणार नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं. ते म्हणाले, शिवसेनेनं सेवेसाठी ७० हुतात्मे दिले आहेत. मी हुतात्मा व्हायला तयार आहे बेळगावचा.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जत तालुक्यातील ४० गावांवर दावा ठोकला. येथून सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटवरही दावा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला.
आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर चर्चा होणार होती. पण, तत्पूर्वी संजय राऊत यांना समन्स आला.
संजय राऊत म्हणतात, शिवसेना ही सीमाबांधवांसाठी कटिबद्ध आहे. महाराष्ट्रासाठी मला अटक करणार असतील, तर मी नक्कीच बेळगावात जाईल. आम्ही लपूनछपून जाणार नाही. आम्ही कोल्हापूरच्या रस्त्यानं जाऊ, असंही राऊत यांनी सांगितलं.
यावर शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्रासाठी बलिदान देण्याची भाषा संजय राऊत करत असतील तर त्यांच बलिदान जाऊ नये. कारण शेवटी राज्यसरकार समर्थ आहे. मुख्यमंत्री राज्याचा विषय हाताळायला समर्थ आहेत. संजय राऊत हे कोर्टाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जात आहेत.
२०१८ च्या भाषणात राऊत यांनी ठोकशाहीची भाषा केली होती. लोकशाही मार्गानं निवडणुका लढऊ, निवडणुका जिंकू. तसं झालं नाही तर ठोकशाहीशिवाय दुसरा विषय नसतो, हा विषय शिवसेनाप्रमुखांनी दिलाय.