माझी पत्रकार परिषद खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, संजय राऊत उद्या काय “बॉम्ब” फोडणार?

माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी विरोधकांना इशारा दिला आहे. तसेच माझी पत्रकार परिषद ही मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार होत आहे. यावरती खुद्द मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे, असे स्पष्टीकरणही यावेळी संजय राऊतांनी दिले आहे.

माझी पत्रकार परिषद खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, संजय राऊत उद्या काय बॉम्ब फोडणार?
संजय राऊतांचा भाजपला इशारा
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 4:40 PM

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणावरून (CBI, Ed) भाजप आणि महाविकास आघाडीत जोरदार वार-पलटवार सुरू आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांनी केलेले आरोपही गाजत आहेत. त्यात माझा लालूप्रसाद यादव करण्याची धमकी दिली हे वाक्य तर सध्या राजकारणात उलथापलख घडवत आहे. या सर्व आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याच पार्श्वभूमिवर संजय राऊतांनी आज सेना भवनात जाऊन आढावा घेतला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी विरोधकांना इशारा दिला आहे. तसेच माझी पत्रकार परिषद ही मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार होत आहे. यावरती खुद्द मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे, असे स्पष्टीकरणही यावेळी संजय राऊतांनी दिले आहे. त्यामुळे उद्याच्या पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत विरोधकांवर कोणते पॉलिटिकल बॉम्ब फोडणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहे.

विरोधकांनी माझी पत्रकार परिषद नीट ऐकावी

भाजपला इशारा देताना संजय राऊत म्हणाले, विरोधकांचं लक्ष उद्या असायलाच पाहिजे. त्यांनी माझी उद्याची पत्रकार परिषद काळजीपूर्वक ऐकायला हवी. केंद्रीय तपास यंत्रणांच्या प्रमुखांनी आवर्जुन ऐकायला हवी. उद्या शिवसेना हा पक्ष नाही तर महाराष्ट्र, मराठी माणूस बोलणार आहे. मला वाटतं उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे ते. हे धंदे सुरु आहेत ना ते बंद होणार उद्यापासून. शिवसेना हाच महाराष्ट्र आहे. कुणीही येतो आणि महाराष्ट्राची बदनामी करतो. महाराष्ट्र उसळेल, अन्यायाविरुद्ध लढेल, नुसता लढणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश आहोत हे दाखवून देऊ, असा कडकडीत इशारा संजय राऊतांनी भाजपला दिला आहे.

उद्या मर्दानगी दिसेल-राऊत

तसेच बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांना जी मर्दानगी शिकवली ती मर्दानगी उद्या दिसेल. कुणीही उठावं आणि महाराष्ट्राची बदनामी करावी हे चालणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसारच ही पत्रकार परिषद होईल. तसेच ही पोलखोल नाही, खोलायला त्यांच्याकडे आहे काय? ते आतून पोकळ आहेत, अशी कोपरखिळीही राऊतांनी भाजपला मारली आहे. त्यामुळे आता राजकारण आणखी तापलं आहे. त्यामुळे विरोधकांपासून ते सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वाचं लक्ष हे राऊतांच्या पत्रकार परिषदेकडे असणार आहे. उद्याच्या या बहुचर्चित पत्रकार परिषदेने महाराष्ट्रातील राजकारणाचा सस्पेन्स वाढवला आहे. तो सस्पन्स उद्याच संपेल.

‘शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आणि उद्या अवघा महाराष्ट्र बोलेल’, संजय राऊतांचा भाजप, केंद्रीय तपास यंत्रणांचा निर्वाणीचा इशारा

VIDEO: तर उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच ‘I Love You’ चा मेसेज पाठवावा लागेल, व्हॅलेंटाईन डे निमित्त शिवेंद्रराजेंची कोपरखळी

Video | अरे यार, हिनं तर खऱ्या अर्थानं ‘बाईट’ दिला! मुंबई पोलिसांच्या हाताला चावणारी ती कोण?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.