राजकारणात कधी काहीही घडू शकतं, अजितदादांबाबतच्या ‘त्या’ प्रश्नावर शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक विधान

Sanjay Shirsat on Ajit Pawar : शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी महायुतीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. अजित पवार गटाच्या भूमिकेवरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांवरही त्यांनी टीका केली आहे. वाचा सविस्तर...

राजकारणात कधी काहीही घडू शकतं, अजितदादांबाबतच्या 'त्या' प्रश्नावर शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक विधान
संजय शिरसाट, शिवसेना आमदारImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 2:01 PM

विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे महायुतीतच राहतील, अशी आमची अपेक्षा आहे. पण राजकारणात कधीही काही घडू शकतात त्यामुळे नेमकं काय घडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, अंस संजय शिरसाट म्हणाले. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरही शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटील यांनी कुणाला चर्चेला बोलायला माहित नाही पण चर्चेतून प्रश्न सुटतात, यावर आमचा विश्वास आहे. या राज्यात शांतता राहावी अशी आमची अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.

राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर

संजय राऊत हा वेडा माणूस फार जास्त वेडा आहे. पंधराशे रुपयांमध्ये घर चालत नाही. हे आम्हालाही मान्य आहे. मात्र आमची ते तरी देण्याची तुमची दानत आहे? तुम्ही काय दिलं? ते आधी सांगा. नाचता येईना अंगन वाकडं हा प्रश्न, बहिणीला दिलं भावाला देतोय तुम्ही काय दिलंय. सरकारच्या योजनेचा आम्हाला फायदा होतो ही सामान्यांची भूमिका आहे, असं म्हणत शिरसाटांनी संजय राऊतांच्या ‘लाडकी बहीण योजने’वरील टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. लोकसभेत काय निकाल लागले सगळ्यांना माहित आहेत. स्वत; शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी महिलांसाठी काय केलं हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारावा, असंही ते म्हणाले.

संजय राऊत कधी लोकांना भेटत नाही कधी ग्राउंडवर जात नाही. 288 पैकी 290 जागा जिंकू शकतात. त्यांचा काही भरोसा नाहीये. एक वेळ काँग्रेसच्या जागा वाढतील पण उभाटाच्या जागा या विधानसभेमध्ये वाढणार नाही. विधानसभेमध्ये काँग्रेस आणि उभाटाची युती होणार नाही. काँग्रेसवाले वाटाशी बोलत सुद्धा नाही. शरद पवार जेव्हा खांदा झटकतील. तेव्हा हे सगळे पाय खाली दिसतील. शिवसेनेचा स्वाभिमान ‘सिल्वर ओक’च्या दाराशी उभा आहे. यांनी जाती-जातीत विष पेरलं आहे, असं संजय शिरसाट म्हणालेत.

मंत्रिमंडळ विस्तार कधी?

राज्यमंत्रिमंडळ विस्तारावरही शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल याचा अर्थ विस्तार होईल. पण तो कधी होईल ही वेळ कुणी सांगू शकत नाही, असं शिरसाटांनी सांगितलं.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.