शिंदे गटाच्या नेत्याची संजय राऊतांवर घणाघाती टीका; म्हणाले, त्यांना सामाजिक जाण…
Shivsena Leader Sanjay Shirsat on Sanjay Raut : शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले? संजय राऊतांवर टीका करताना त्यांनी काय म्हटलंय? वाचा सविस्तर...
संजय राऊतांच्या आरोपांत काहीही तथ्य नाही. एजन्सी कोणतीही असो ते निष्कर्ष काढतील. आरोपी असतील तर कारवाई होणार आहे. संजय राऊतांवर आरोप ते तर बाहेर आहेत. यांची अडचण अशी की वॉशिंग मशीनमध्ये कधी जायचं? संजय राऊतांना सामाजिक जाण नाही. ना शेतकरी, ना आरक्षण कुणावरही बोलत नाहीत. संजय राऊत फक्त वल्गना करत राहतील. पण एक दिवशी हेच क्लीन बोल्ड होतील. संजय राऊत यांना केवळ हेडलाईन तयार करायची आहे. ठाकरे गट दाऊदवर टीका करतात आणि त्याच्याच लोकांना रॅलीत घेऊन नाचतात. पाकिस्तानी झेंडे नाचवतात, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले आहेत.
लाखोंचा जनसमुदाय… नवीन ड्राईव्ह इथे होता. मंत्र्यांच्या बंगल्यावर कोटी खर्च करता, पण खेळाडूंना पैसे दिले की पोटात दुखतं. क्रिकेटवर टीका जनता पाहतेय. विजय वडेट्टीवार यांची निंदा होईल. खेळाडूंच्या आनंदावर विरझण घातलं जातंय. जनता यांना धडा शिकवेल, असंही संजय शिरसाट म्हणालेत.
नवाब मलिकांबाबत म्हणाले…
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन क्रिकेट मॅचेस होतात का? ते त्यांचं काम करतात आम्ही आमचं करतोय. गर्दी जमवणारा एकच नेता होता बाळासाहेब ठाकरे, बाकीचे सगळे तीनपट नेते होते. आम्ही घरात बसून काम करत नाही. नवाब मलिक आम्हाला अडचणीचं ठरण्यापेक्षा अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाबाबत प्रतिक्रिया
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील रॅली करत आहेत. अशातच संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हैद्राबाद गजेट तपासण्यासाठी शिंदे समिती जातेय म्हणजेच आम्ही आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहोत. हे स्पष्ट होत आहे. प्रत्येक ठिकाणी लाईनीत कुणबी सर्टिफिकेट दिलं जात आहेत, असं शिरसाटांनी म्हटलं आहे.
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीत अनेक लोक पक्ष बदलतात. पण निवडणूक जिंकण्यावर आमचा भर आहे. 365 दिवस आम्ही काम करतो. निवडणुकीला 10 लोक उभे राहतात हे 11 वे आहेत, असं ते म्हणालेत.