संतोष बांगर एक चांगले आमदार, पण…; संजय शिरसाट यांचं म्हणणं नेमकं काय?
याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असेल. त्यांना त्याबद्दल समज शिंदे देतील. संतोष बांगर हे माझे सहकारी आहेत. त्यामुळं त्यांच्याबद्दल वक्तव्य करणं योग्य नाही, असंही संजय शिरसाट यांनी सांगितलं.
मुंबई : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी शिक्षकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यांच्यासोबत ३०-४० कार्यकर्त्यांवर गु्न्हा दाखल झालाय. एका शिक्षकाला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. तो कुणालातरी मारहाण करतात. हे पक्षाच्या प्रतिमेला मलिन करणारे नाही का?, यावर बोलताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, संजय बांगर हा एक चांगला आमदार आहे. पण, काही गोष्टी त्यांच्या मनाला खटकतात. म्हणून तो भावनावश होतो.
मागल्या वेळी एक घटना घडली. आता हे दुसरं प्रकरण आहे. या प्रकरणी नेमकं काय घडलं याची मलाही पूर्ण माहिती नाही. परंतु, कोणत्याही आमदारानं हात उचलताना काळजी घेतली पाहिजे. आपली प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मारहाण करणं हे कुणालाही योग्य वाटतं नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हंटलं.
मुख्यमंत्री दखल घेतील
खिचडीचं प्रकरण, फोनवरून दमदाटी देणं, अशी काही संतोष बांगर यांच्याविरोधात प्रकरण आहेत. याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असेल. त्यांना त्याबद्दल समज शिंदे देतील. संतोष बांगर हे माझे सहकारी आहेत. त्यामुळं त्यांच्याबद्दल वक्तव्य करणं योग्य नाही, असंही संजय शिरसाट यांनी सांगितलं.
प्रत्येकाचे मत वेगवेगळे असते
सीव्होटर्सच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील. भाजप-शिंदे गटाला मोठा फटका बसेल, असा सर्व्हे समोर आला. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, निवडणुकीच्या काळात अशाप्रकारचे आठ-दहा सर्व्हे येतात. प्रत्येकाचे मत वेगळे असते. काही भागातील सॅम्पल घेतात. निवडणूक लढविली जाते तेव्हा बऱ्याच गोष्टी असतात.
पक्षाचं काम, उमेदवाराचं काम तसेच राजकीय परिस्थिती यावर सर्वकाही अवलंबून असते. उद्याचा सर्व्हे सांगताना तो भविष्य असतो. निवडणुकीच्या काळात सॅम्पल घेतलं तर त्यामध्ये दम असतो. दीड-दोन वर्षांपूर्वी सर्व्हे घेतला गेला. तो कायम कसा राहणार? असा सवाल संजय शिरसाट यांनी विचारला.