वाल्मिकी कराडवर एकट्या परळीत 23 गुन्हे, मुख्यमंत्र्यांकडे गुन्ह्यांची यादीच देणार; अंजली दमानिया म्हणाल्या, त्याला मोकाट…
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण राज्यभरात तर गाजलचं पण हिवाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही याप्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण राज्यभरात तर गाजलचं पण हिवाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. राष्ट्र्वादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार , तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही देशमुख कुटुंबियांची भेट घेत न्याय मिळवून देण्याच वचन दिले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचे नाव वारंवार समोर येत असून ते मुख्य आरोपी आहेत. वाल्मिक करडावरून विरोधक सातत्याने सरकारला धारेवर धरत असून धनंजय मुंडे यांच्याविरोधातही भूमिका घेताना दिसत आहे. हे प्रकरण तापलेलं असतानाच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही याप्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
त्यांनी या मुद्यावरून ट्विटही केले असून टीव्ही9 शी बोलतानाही त्यांनी या विषयावर मौन सोडलं. ‘ वाल्मिक कराड यांच्यावर फक्त परळीत 23 गुन्हे आहेत. त्याचे सेक्शन्स पाहिले तुम्ही तर एकेक सेक्शन त्यांच्यावर 4-5 वेळा लागले आहेत. म्हणजे इतका माहीर गुन्हेगार आहे. आणि आजपर्यंत ते फरार आहेत की त्यांना फरार केलं गेलंय? हा सगळ्यात महत्वाचा आणु मूळ प्रश्न आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या. याच्या विरुद्ध कुठल्याही परिस्थितीत जनतेने लढा दिलाच पाहिजे , असेही त्यांनी नमूद केलं.
त्याला शिक्षा होत नाहीये हे महाराष्ट्राचं दुर्दैव
आता माझ्याकडे जी लिस्ट आहे ती मी तुम्हाला देते, त्याच्यातले गुन्ह्यांची गंभीरता तुम्ही पहा. त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर लायसन्स नसताना आर्म्स ॲक्टखाली ( 3/24 आणि 4/25 ) सीरियस गुन्हे दाखल आहेत. तरीही तो माणूस अगदी आरामात फिरतो. आणि त्याला काहीच शिक्षा होत नाहीये, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, अशी खंत दमानिया यांनी व्यक्त केली.
त्यांनी आज बीडमध्ये जी दहशत निर्माण केली आहे, ते काय काय करतात हे बीडच्या कुठल्याही सामान्य माणसाला विचारलं ना तर ते सांगतली. खंडणी वगैरे त्यातले फार चिल्लर गोष्टी आहेत, त्याच्यापेक्षा अतिशय गंभीर गुन्हे हे सर्रास करतात, असा आरोप दमानिया यांनी लावला आहे.
मु्ख्यमंत्र्यांची भेट घेऊन देणार संपूर्ण यादी
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण यादी दाखवणार आहे. असे लोकं, त्यांना ठेवणारे धनंजय मुंडे यांच्यासारख्या लोकांना तुम्हाला मंत्रीपद का द्यावसं वाटलं,कोणत्या बेसिसवर त्यांना मंत्रीपद दिलं ? असा सवाल विचारणार आहे. मुख्यमंत्र्यांना मी याचा जाब विचारणार असून कराड यांना शोधा आणि अटक करा अशी मागणी करणार असल्याचे दमानिया यांनी ठासून सांगितलं.
आपण जर टोटल सेक्शन किती वेळा लागलेत बघितलं, तर या लिस्ट प्रमाणे 45 वेळा त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे लागले. या गुन्ह्यांमध्ये काय आहे तर कोणाला दाबून ठेवलं, कोणाला जिवे मारण्याची धमकी दिली, कोणाला मारण्याचा प्रयत्न केला, इलीगल लॅमिनेशन ठेवलं म्हणजे गनचा लायसन्स गन ठेवली असे सगळे जे गंभीर सेक्शन्स आहेत.
इतके गंभीर गुन्हे असताना आपण या माणसाला का मोकाट सोडले? हा प्रश्न आज आपण याचे उत्तर मात्र जनतेला, बीडच्या लोकांनी दिलं पाहिजे, कारण हे त्यांना भोगाव लागतंय. राजकारण तुम्ही करताय पण भोगावं बीडच्या जनतेला लागंतय असं म्हणत दमानिया यांनी ठोस कारवाईची आणि अटकेची मागणी केली.