यंदाची आषाढी एकादशी पूजा देवेंद्र फडणवीसच करणार; जयकुमार गोरे यांचे भाकीत; सरकारवर परिणाम होणार नाही संजय राऊतांचा विश्वास
मंत्री आणि गटनेते असलेले एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत 35 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा करत हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत सरकार स्थापन करावे असा प्रस्तावही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवल्यानंतर साहजिकच भाजपमधील इतर नेत्यांना आता भाजप सरकार स्थापन करू शकते असा विश्वास प्राप्त झाला आहे.
मुंबई : विधान सभेच्या निकालानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे, मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबरची साथ सोडून हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत सत्ता स्थापन करा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर ठेवण्यात आला. या प्रस्तावानंतर सूरतमध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांचे अपहरण करण्यात आल्याची आरोपही करण्यात आला. राजकारणातील या घडामोडी घडत घडत असतानाच दुसरीकडे मात्र भाजपचे साताऱ्यातील आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jaykumar Gore) यांनी एक भाकीत केले आहे. महाविकास सरकार कोसळण्याआधीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पंढरपूरातील आषाढी एकादशीची पूजा देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) करतील असे भाकीत जयकुमार गोरे यांनी केले आहे.
साताऱ्याचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याआधीच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपपुरस्कृत सरकार अस्तित्वात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आमदार जयकुमार गोरे यांच्या या वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असला तरी आज सायंकाळी होणाऱ्या बैठकीनंतरच राज्यातील पुढील रीज
हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत सरकार स्थापन करा
मंत्री आणि गटनेते असलेले एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत 35 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा करत हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत सरकार स्थापन करावे असा प्रस्तावही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवल्यानंतर साहजिकच भाजपमधील इतर नेत्यांना आता भाजप सरकार स्थापन करू शकते असा विश्वास प्राप्त झाला आहे. त्यामुळे साताऱ्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी मविआचे सरकार कोसळण्याआधीच आषाढीची पंढरपुरातील पूजा देवेंद्र फडणवीस करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
बंडाळीमुळे राजकीय वातावरणाला कलाटणी
विधान परिषदेच्या निकालानंतर केलेल्या या बंडाळीमुळे राज्यातील राजकीय वातावरणाला आता कलाटणी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे मात्र मुंबईतील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला जोरदार विरोध केला आहे. त्याच बरोबर शरद पवार, संजय राऊत, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी मात्र सरकारला कोणताही धोका नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
‘मविआ’वर परिणाम होणार नाही
दिल्लीत झालेल्या शरद पवरांच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी हा शिवसेनेचा अंतर्गत विषय असून त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या सरकारवर होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.